युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर




महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

मुंबई, दि. 31 : राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
 जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.

नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे

शासकीय महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या नियुक्त्या
महामंडळ / समिती

1)  हाजी अरफात शेख

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर

उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील

सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ

4)  हाजी एस. हैदर आझम

अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

5) सदाशिव दादासाहेब खाडे

अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील

अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार

उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

8) आशिष जयस्वाल

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ

9) प्रकाश नकुल पाटील

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ

10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील

उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

11) जगदिश भगवान धोडी

उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

12)उदय सामंत

अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण

13) श्रीमती ज्योती दिपक ठाकरे

अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ

14)विनोद घोसाळकर

सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ

15) विजय नाहटा

सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

16) रघुनाथ बबनराव कुचिक

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ

17) मधु चव्हाण

अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

18) संदिप जोशी

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ

19) प्रशांत ठाकूर

अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ

20) मो. तारिक कुरैशी

अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे

अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ
0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या