आजपासून कार, मोटार सायकल महागणार



आजपासून कार, मोटार सायकल महागणार

नवी दिल्ली - कार किंवा मोटरसायकल विकत घेणं एक सप्टेंबरपासून महागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (इरडा) या विमा नियंत्रकाच्या निर्देशांनुसार आजपासून दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा उतरवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार इरडाने हे निर्बंध लागू केले आहेत. एक हजार सीसी खालील गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 5,286 रुपये मोजावे लागणार आहेत, एक हजार ते दीड हजार सीसी मधल्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 9,534 रुपये तर दीड हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 24,305 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मोटारसायकलच्या बाबतीत पाच वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यापोटी 75 सीसी खालील गाड्यांना 1,045 रुपये, 75 ते 150 सीसी मधल्या गाड्यांना 3,285 रुपये, 150 ते 350 सीसी मधल्या गाड्यांना 5,453 रुपये तर 350 सीसी वरील गाड्यांना 13,034 रुपये इतका प्रीमियम भरावा लागणार आहे.

🔸मोटर वेहिकल अ‍ॅक्टनुसार थर्ड पार्टी विमा काढणं बंधनकारक

आधी हा विमा एका वर्षाचा मिळायचा, परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहनचालक विम्याचे नूतनीकरण नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, अपघातांमध्ये त्रयस्थ व्यक्तिंना विम्याचे संरक्षण त्यामुळे मिळत नसल्याचे समोर आल्यावर सुप्रीम कोर्टाने गाडी विकतानाच दीर्घ मुदतीचा काढावा असे आदेश इरडाला दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !