युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

राज ठाकरे म्हणाले. ..नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईन!


राज ठाकरे म्हणाले. ..नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईन!

केज  ( प्रतिनिधी )

केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत खूप उत्सुकता होती . यातच राज ठाकरे येणार म्हणून केज तालुक्यातील जनतेला त्यांना ऐकण्याची ईच्छा होती परंतु राज ठाकरे आले थोडक्यात त्यांनी सांगितले की फक्त आज सभा नाही आणी नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईल असे आश्वासन सुध्दा दिले आणी अवघ्या एक मिनिटांत सभा आटोपली . पंचायत समितीच्या सभागृहात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या .
अवघ्या काही मिनिटांनी सुध्दा राज ठाकरे यांना प्रत्यक्ष बघण्याची ईच्छा पुर्ण झाली परंतु ऐकण्याची ईच्छा मात्र अपुरीच राहिली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या