परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शोभायात्रेने जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी

शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी 
 शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी 
जिरेवाडी   : श्रीरंग मुंडे .... ...
       जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.  शोभायाञा, विविध देखावे हे या मिरवणुक सोहळ्याचे आकर्षण ठरले. 
  •            जिरेवाडी येथे दरवर्षी भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक ऊपक्रम राबवले जातात. शुक्रवारी जयंतीनिमित्त ह.भ.प. विजयानंद महाराज आघाव यांचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाल.  संध्याकाळी चार वाजता मिरवणुक सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे  नेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी या मिरवणुक सोहळ्याचे ऊद्घाटन केले. आपल्या भाषणात प्रा. टी. पी. मुंडे यांनी  जयंतीच्या यशस्वी आयोजनाबाद्दल राहुल कांदे व त्यांच्या सहका-यांचे कौतुक केले. यावेळी पाटील अंगदराव मुंडे, भगवानराव कांदे, सरपंच गोवर्धन कांदे, जि.प. सदस्य प्रदीप मुंडे, दिपक शिंदे, अशोक दळवे, प्रा. विजय मुंडे, गोविंद बबनदादा फड, सुर्यकांत मुंडे,  भास्करनाना रोडे, प्रा. प्रताप कांदे (सर), लक्ष्मणराव कांदे, संजय पवार, ऊपसरपंच शिवाजी मुंडे,  ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मुंडे, भागवत मुंडे, बालाजी (पिंटू) मुंडे, ईश्वर कांदे, गोविंद पाटलोबा मुंडे, राजीव मुंडे,  यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीक, युवक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. मिरवणुकीमधे भजनी मंडळ, महीला सहभागी होत्या. संत भगवानबाबांच्या घोषनांनी परीसर भक्तीमय झाला होता.



           यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत जयंतीचे अध्यक्ष राहुल कांदे यांच्यासह वैजनाथ कांदे, गोपाळ कांदे, श्रीमंत मुंडे, मनराज मुंडे, सचिन मुंडे, शुभम मुंडे, रवी मुंडे, महादेव कांदे, नितीन कांदे, गणेश गवळी, दत्ता मुंडे, अभिजीत गुड्डु मुंडे, राजु मुंडे, सोमनाथ सुरवसे, बालाजी धोंडीराम मुंडे, आकाश नागरगोजे यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने ऊपस्थित होता.

*•••••*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!