वद्य एकादशीच्या पर्वकाळात. .....परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!*


*परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!*

परळी वैजनाथ /प्रतिनिधी  . ...
      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी  आज श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच दर्शनार्थी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे श्रावणी वद्य एकादशीच्या पर्वकाळात दिंड्यांसह भाविकांनी मेरुप्रदक्षिणा साधली.संत सोपानकाका महाराज दिंडीतील भजनी ठेक्यातील पाउले  लक्षवेधी ठरली.


      पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज  देशातील विविध ठिकाणचे भाविक दाखल होतात.श्रावण पर्वकाळ संपत आला असून या महिन्यातील शेवटची दर्शन पर्वणी वद्य एकादशी असते. तसेच वद्य एकादशी ही परळीच्या वारीची एकादशी म्हणून भाविक नित्यनियमाने वारी करतात. आज  श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल  झाले होते. दरम्यान मंदिर परिसर भाविकांनीफुलून गेला. दिवसभरात हजारो भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

    @@@@@
  पुर्व पायर्‍यांवर भक्तीचा भजनानंद. ....!
      दरम्यान या दिंड्या वैद्यनाथ मंदिर येथे भजन करत दाखल होउन पुर्व पायर्‍यांवर भक्तीचा भजनानंद पहावयास मिळतो. टाळ मृदगांच्या निनादात आणि जयघोषात या ठिकाणी भजनाचे विविध प्रकार सादर केले जातात. भजनाचा ठेका धरत पाउले खेळली जातात. चक्री भजन, विविध चाली, पाउल, पुर्व पायर्‍यांवर बैठे भजन, दंडवत भजन आदी प्रकार सादर केले जातात.आज पुर्व पायर्‍यांवर हा भजनानंद पहावयास मिळाला. संत सोपानकाका महाराज मंदिर च्या दिंडीने लक्षवेधुन घेतले होते. या भजनी फडाचे प्रमुख हभप पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार