परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले*

*परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले* 

परळी वैजनाथ : प्रतिनिधी 
         शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दिड लाखांची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले. 
             २०१२ साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती. बीड एसीबीने तक्रारीची खातरजमा करून पाळत ठेवली असता मोदी याने दि. १ सप्टेंबर रोजी दिड लाख रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित ५० हजार एक महिन्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार आज शनिवार रोजी बीड एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या पेठ गल्ली देशमुख पार येथील राहत्या घराच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे विद्यमान लिपिकाने दिलेली दिड लाखांची रक्कम स्वीकारताच मुख्याध्यापक मोदी याला एसीबीच्या पथकाने झडप घालून रंगेहाथ पकडले.
     ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, दादासाहेब केदार, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने यांनी पार पाडली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !