_रस्त्यावरील खड्यांवरून धनंजय मुंडेंचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल_*


*_रस्त्यावरील खड्यांवरून धनंजय मुंडेंचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल_*

*चंद्रकांत दादा , रस्ते दुरूस्तीवर खर्च केलेले हजारो कोटी कोणाच्या खिशात गेले ?*

परभणी दि. 01....................... राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आता त्याची दखल घेईल असा मिश्किल टोला लगावतानाच रस्ते दुरूस्तीवर मागील चार वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रूपये नेमके कुणाच्या खिशात गेले ? असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केला आहे.

मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. सुप्रिया ताई सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे हे ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनात उडी घेत धनंजय मुंडे यांनी ही आज खड्यासोबत सेल्फी घेऊन तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे.

 आज वाशिम येथे एका कार्यक्रमाला जात असताना गंगाखेड-परभणी या रस्त्यावर पडलेल्या खड्यांसमवेत त्यांनी हा सेल्फी घेऊन श्री. चंद्रकांत दादा,  हे पहा रस्त्यांवरील खड्डे असे म्हणत ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मागील आठवड्यातही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटले होते, तेंव्हाही श्री. मुंडे यांनी चंद्रकांत दादा यांना ,  खड्डा दाखवा बक्षिस मिळवा या योजनेतील हजार रूपये आता मित्र पक्ष शिवसेना आणि श्री. आदित्य ठाकरे यांना ही पाठवा असा टोला लगावला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार