_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ .....




_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_
●  *मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी; उद्घाटनाला सिनेअभिनेत्री अमिषा पटेल* ●
परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ......
      राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव -2018 मध्ये या वर्षीही विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध  सिनेअभिनेत्री अमिषा पटेल च्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

       नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून परळीकर रसिकांसाठी मनोरंजन व  सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. मोंढा मैदानावर सर्व कार्यक्रम सादर होणार आहेत.१३ सप्टेंबर रोजी ना. धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील व पुनम कुडाळकर प्रस्तुत 'तुमच्यासाठी काय पण ' कार्यक्रम होणार आहे.



   दि.१४ रोजी सिनेतारका अर्चना सावंत व पुजा सावंत प्रस्तुत 'नार नखरेली' , दि.१५ रोजी 'घरात मॅरिड, बाहेर बॅचलर' , दि. १६ रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे प्रस्तुत 'भीमगीते' कार्यक्रम होणार आहे. दि. १७ रोजी सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांचा आॅर्केस्ट्रा सादर होणार आहे. दि. १८रोजी सिने तारका मेघा घाडगे प्रस्तुत 'रंगबाजी' (लावणी), दि. १९रोजी कव्वाल मुस्तबा अजिज नाजा प्रस्तुत ' कव्वाली मुकाबला' दि. २०रोजी चला हवा येउ द्या फेम भाऊ कदम व सागर करांडे प्रस्तुत 'करुन गेलो गाव' ,दि. २१रोजी सिने तारका मानसी नाईक प्रस्तुत ' मदमस्त अप्सरा' कार्यक्रम होणार आहेत. दि. २२ रोजी ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे.
      या सर्व कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन नाथ प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !