माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे दुःखद निधन*

*माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे दुःखद निधन*
 माजलगाव /प्रतिनिधी. ..
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे शुक्रवार 31 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
ते परळी तालुक्यातील हिवरा ( गो.) येथील मूळचे रहिवाशी होते. 1978मध्ये नरहरराव निर्मळ माजलगाव बाजार समितीचे उपसभापती असताना त्यांनी सेवेत प्रारंभ केला.
   माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. कमी कालावधीत परळी मार्केटचे सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सिरसाळा येथे जयभवानी पतसंस्था उभारून नावारुपाला आणली. सहकार व मार्केटिंग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. शिस्तप्रिय असलेले फुके यांनी माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीला यशाच्या शिखरावर घेऊन गेलेे.
      शुक्रवारी दुपारी चार वाजता सिरसाळा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
  डि.बी.फुके यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, तीन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने फुके कुटुंबाचा मोठा आधार गेला असून, दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  सिरसाळा, हिवरा व माजलगाव परिसरातील सामाजीक क्षेत्रात काम करणारे असंख्य मान्यवर, कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच  ग्रामस्थ मोठ्या संख्याने  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !