शेखर अंकल यांना पितृशोक

शेखर अंकल यांना पितृशोक
परळी वैजनाथ ता.३१ (प्रतिनिधी)
              येथील शास्त्रीनगर भागातील जेष्ट नागरिक शिवलिंग लक्ष्मणअप्पा फुटके (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
           शिवलिंगअप्पा फुटके येथील धार्मिक कार्यात सतत आघाडीवर असत, मागील काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी (ता.३०) रात्री १०.३० च्या सुमारास आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. शुक्रवारी (ता.३१) सकाळी ११ च्या सुमारास येथील विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.सहशिक्षक चंद्रशेखर (अंकल) व वैद्यनाथ बँकेतील पिगमी ऐजंट शांतलिंग फुटके यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार