खोटी माहिती व्हायरल करणे आले अंगलट; वडवणीच्या शिक्षकावर कारवाई



 खोटी माहिती व्हायरल करणे आले अंगलट; वडवणीच्या शिक्षकावर कारवाई

बीड - मराठा क्रांती मोर्चासंदर्भात आलेली एक खोटी माहिती कुठलीही शहानिशा व्हायरल करणे वडवणी येथील एका शिक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती टाकून अफवा पसरविणाऱ्या वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दादासाहेब सूर्यभान जाधवर (वय ४०, रा.वडवणी) यांच्यावर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सुशिक्षितांकडूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अफवा पसरविल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

३० आॅगस्ट रोजी जाधवर यांना टाकरवण येथील शाळेचे मुख्याध्यापक शेळके यांनी सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ या ग्रुपवर मराठा आरक्षणावर त्वरित निर्णय न लागल्यास १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद अशी पोस्ट टाकली. या पोस्टची  कुठलीही शहानिशा न करता ती पोस्ट जाधवर यांनी ‘जिथे बातमी तिथे आम्ही’ या ग्रुपवर टाकून व्हायरल केली. हा प्रकार बीड पोलिसांना समजला. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी प्रकरणाची शहानिशा करुन दादासाहेब जाधवर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी चूक झाल्याचे कबूल करताच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

🔸सुशिक्षितांकडूनच उल्लंघन :

प्रत्येकाच्या हातात अँड्राईड मोबाईल आला आहे. इंटरनेटची सुविधाही आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, आलेल्या पोस्टची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.असे प्रकार सर्वाधिक सुशिक्षितांकडूनच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !