ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन*

*ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन*

*जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल* 

जामखेड दि. ०८ -----  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चौंडी येथे आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भेट देवून त्यांचे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगांवी म्हणजे चौंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी चौंडी येथे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. येथील महादेव मंदिरात जाऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मंदिर परिसरात असणा-या सभागृहात त्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले. 




पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्या संकटावर मात करून उत्तम व आदर्श असा राज्य कारभार केला. आजच्या महिलांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याची खरी गरज आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. चौंडी तीर्थक्षेत्र विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. 
कार्यक्रमास जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. गणपतराव देशमुख, माजी मंत्री अण्णा डांगे, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिका राजळे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !