भानामतीची बनवाबनवी करत पैशांचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद.



भानामतीची बनवाबनवी करत पैशांचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद.
_________________________________

बीड - जादुटोणा, भानामती आणि आघोरी विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडून गुप्तधन, सोने काढण्यासाठी एक टोळी बीड जवळील समानपूर येथील राजाभाऊ अंबादास गोरे यांच्या घरी आली होती. याची माहिती मिळताच दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पैशाचा पाऊस पाडणाऱ्या या टोळीला जेरबंद केले. गुरुवारी मध्यरात्री दरोडा प्रतिबंधक पथक पेट्रोलींग करत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना अशी माहिती मिळाली की, बीड जवळील समनापुर येथे राजाभाऊ गोरे यांच्या घरी आज एक टोळी पैशांचा पाऊस पाडणार आहे. या माहितीवरुन दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. राजाभाऊ गोरे यांच्या राहत्या घरी पाच जण जादूटोणा, भानामती, आणि अघोरी विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडून गुप्तधन काढणार होते. घरात पुजा मांडून हळद कुंकू, लिंबू, नारळ, तांदूळ, नवा कपडा आणि भानामती अशी बनवाबनवी कार्यक्रम चालू असताना दरोडा प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. यावेळी पाच आरोपींना ताब्यात घेतले. यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी शेतकरी राजाभाऊ गोरे यांना आमिष दाखवून पैशाचा पाऊस पाडणार होतो असे सांगितले. राजाभाऊ गोरे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाने पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक जि.श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय अधिकारी सुधिर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली. सपोनि गजानन जाधव यांच्यापथकाने केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार