राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे थाटात भूमिपूजन*


*राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे थाटात भूमिपूजन*

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने होणारे स्मारक सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान ठरेल -खा. डाॅ. प्रितमताई मुंडे*

पाटोदा दि. ३१ -------  प.पू.राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी सर्वांना समतेची, एकतेची शिकवण दिली. अशा या महान संतविभुतीच्या शिकवणीवर चालत लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचित, अनाथ यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. भगवानबाबांच्या चरणी आपले यश, आपला संघर्ष त्यांनी अर्पण केला. हाच वसा ना.पंकजाताई आणि मी वारसा म्हणून चालवत आहोत, त्यांच्या पुढाकाराने आज भगवानबाबांच्या भव्यदिव्य अशा स्मारकाचे भुमिपुजन माझ्या हस्ते होत आहे हे माझे भाग्य आहे. असे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रसंत प.पू.भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगांव येथे स्मारकाच्या भुमिपुजन प्रसंगी केले.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांचे जन्मगांव पाटोदा तालुक्यातील सावरगांव येथे विविध विकास कामांचा आणि भव्यदिव्य अशा स्मारकाच्या कामाचा शुभारंभ खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भगवानबाबांच्या 122 व्या जयंती कार्यक्रमास मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे. या ठिकाणी आज भगवानबाबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ झाला. पण ख-या  अर्थाने आपल्या सर्वाच्या पालक ना.पंकजाताई मुंडे यांनी मात्र हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी ध्यास घेतला आहे. ध्यास घेणे म्हणजे काय हे मी अनुभवत आहे. भगवानबाबांचे स्मारक उभे करणे हे काही फार मोठे काम नाही. पण हे स्मारक उभारण्या मागचा उद्ेश फार महत्वाचा आहे. या स्मारकाच्या माध्यमातून भगवानबाबांची शिकवण सदैव आपल्या आठवणीत राहिल. त्यांनी दिलेल्या समतेचा विचार आपल्यात जागृत राहिल. त्यांनी दिलेले संस्कार पुढील पिढीवरही घडावेत यासाठी हे स्मारक आवश्यक आहे. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची भगवानबाबांवर नितांत श्रध्दा होती. अगदी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यभराच्या संघर्षाचे यश त्यांनी सर्वात प्रथम भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांना अर्पण केले. आपल्या आयुष्यात अडचणी असतील, संकटे असतील, अपयश असेल साहेब नेहमीच बाबांच्या चरणी मस्तक ठेवून, त्यांचे आशिर्वाद, शक्ती, उर्जा, प्रेरणा घेवून पुन्हा जोमाने दिन,दुबळया च्या न्याय हक्कासाठी लढत राहिचे. बाबांच्या आशिर्वाद त्यांच्या पाठिशी नेहमी असायचे. त्यांचाच वसा आणि वारसा ना.पंकजाताई या चालवत आहेत. त्यांच्या या वाटचालीत त्यांची लहान बहीण म्हणून नेहमीच मी त्यांच्या सोबत चालत आहे. आज भगवानबाबांच्या जन्मगांवी विकास व्हावा ही इच्छा भगवानबाबांचीच आहे आणि तो ना.पंकजाताईंच्या हातून व्हावा हि बुध्दी, ही प्रेरणा मुंडे साहेबां प्रमाणेच बाबांनी पंकजाताईंना आशिर्वाद रुपी दिली आहे. आमच्या पाठिमागे निश्चितच बाबांचे आशीर्वाद आहेत असे म्हणत आज जिल्हयात रोज नवीन कामे सुरु होताना दिसत आहेत. ना. पंकजाताई रोज नवीन कामांना सुरुवात करीत आहेत. दलित, वंचित,पिडीतांना न्याय देण्याची त्यांची भुमिका आहे मात्र या भुमिकेला काही समाजकंटक नेहमीच विरोध करत आहेत त्यासाठी ना. ताई संघर्ष करत आहेत.  अशा समाज कंटकांना त्या घाबरत नाहीत कारण जो पर्यत ही मायबाप जनता आमच्या सोबत आहे तो पर्यत कोणाला घाबरण्याचे कारण नाही असेही त्या म्हणाल्या.

*ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत*
--------------------------------?
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचे सावरगांव येथे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून केलेल्या स्वागताने वातावरण भारावून गेले होते.

*असे असणार स्मारक*
--------------------------
गतवर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जन्मभूमीत भव्य दिव्य स्मारक व या भागाचा सर्वागिण विकास करण्याचा शब्द दिला होता, त्यांची शब्दपूर्ती आजच्या भूमिपूजनाने झाली. याठिकाणी दोन एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार असून ' बैसोनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी ' या उक्तीप्रमाणे    भगवानबाबांची पंचेवीस फुट उंचीची पाण्यातील मुर्ती याठिकाणी  उभारण्यात येणार आहे, शिवाय मोठे सभागृह तसेच भक्तांसाठी अनेक सोयी सुविधा येथे असणार आहेत.
------------
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले. व्यासपीठावर जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार, ह.भ.प.खेडकर महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सभापती संतोष हंगे, जयदत्त धस, कल्याण आखाडे, अॅड.सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, स्वप्नील गलधर, सुनिल मिसाळ, गो.गो.मिसाळ, अॅड.सुधीर घुमरे, ह.भ.प.बुवा महाराज खाडे, माऊली जरांगे, रामदास बडे, मुरलीधर ढाकणे, अनुरथ सानप, चंद्रकांत फड, सत्यसेन मिसाळ, मधुकर गर्जे, जयश्री मुंडे, रावसाहेब लोखंडे, अमोल तरटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशितील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !