पोस्ट्स

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

इमेज
 * स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !*  *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले.         परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीसांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

MB NEWS-वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याने केले  दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.       अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.      वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कारखान्याने गाळपाची यशस्वी परंप

MB NEWS-दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय

इमेज
  दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय * परळी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्य बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीत परळी वैजनाथ येथील दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मूंडे हा द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे ‌. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत 74 किलो वजन गटात तिसऱ्या फेरी अंतीम कुस्ती मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या त्याच्या यशाबद्दल परळी येथील दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री देविदास राव कावरे सर,मार्गदर्शक सुभाष नाणेकर सर,शिव शंकर कराड,प्रशिक्षक प्रा.अतुल दुबे सर प्रा.डॉ जगदीश कावरे सर यांच्या सह परळी तालुक्यातील कुस्ती प्रेमिनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS-उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक

इमेज
  उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक बीड (प्रतिनिधी) केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सामील झाल्या आहेत. दरम्यान या बंदला बीड जिल्हा व्यापारी महासंघासह बीड शहर व्यापारी महासंघानेही जाहीर पाठींबा दिला असून व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करावा असे आवाहन व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे. भारत बंदसंबंधी व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.24) बीड येथे एमआयडीसीतील मॉ वैष्णो पॅलेसमध्ये बीड जिल्हा व शहर व्यापारी महासंघाची व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी सीए भानुदास जाधव व सीए गोपाल लड्डा यांनी मार्गदर्शन केले. जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. या भारत व

MB NEWS-आमच्या परळीचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
  आमच्या परळीचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी )            परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवले आहेत.आमच्या परळीचे भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील या शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी स्व.भुजंगराव कुलकर्णी यांच्या समवेत खा. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे संवाद साधत असतानाच्या छायाचित्रासह ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.                              ----------------------------------------

MB NEWS-भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले* *_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_*

इमेज
 * भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले* *_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_* परळी । दिनांक २४ । माजी सनदी अधिकारी तथा परळीचे भूमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मराठवाडयातील पहिले आयएएस अधिकारी, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माझ्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र गाढे पिंपळगाव येथील मुळ रहिवासी असलेले भुजंगराव कुलकर्णी यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. अतीव दुःख झाले, मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तीमत्व हरपले, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. ••••

MB NEWS-मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना

इमेज
  मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना परळी वैजनाथ, प्रतिनिधी :             मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी व परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहे.            भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव (गाढे) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘त

MB NEWS-राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयाचे आज पंकजाताई व प्रितमताई यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयाचे  आज पंकजाताई व प्रितमताई यांच्या हस्ते उद्घाटन परळी (प्रतिनीधी)  जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य तथा भाजपा नेते राजेश गित्ते यांच्या शिवाजी चौक भागातील लोकनेता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते बुधवार दि.24 रोजी होत असुन या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राजेश गित्ते यांनी केले आहे.  जुनी पंचायत समिती बाजुस राजेश गित्ते यांचे लोकनेता संपर्क कार्यालय उभारले असुन या कार्यालयाचे बुधवार दि.24 रोजी सकाळी 10 वा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते तर भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे.मागील अनेक वर्षांपासुन शिवाजी चौक भागात राजेश गित्ते यांचे संपर्क कार्यालय असुन या कार्यालयाच्या माध्यमातुन असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.आज नविन जागेत लोकनेता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोरोनाचे सर्व नियम पाळून केले जाणार असु

MB NEWS-सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

इमेज
  सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन  शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष सोनपेठ दि.२२(प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी विज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी व सरकारला सुबुद्धी लाभावी यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन दि.२६ रोजी आत्मक्लेष करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे.  थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनाने विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिके उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळे शेतकरी आत्मघाता सारखा गंभीर मार्ग अवलंबत आहे.  पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल बसुलीचा खंजीर खुपसत आहे.  या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळे प्रचंड नैराश्यात आहेत.  राज्य

MB NEWS- *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी*

इमेज
 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी* सोनपेठ  (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा  येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली.           कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री एस.डी.जालमिले, आर. बी.जोशी, ए.एस.चाटे, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, सोमनाथ सातपुते,दिलीप व्हावळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

MB NEWS-माणिकनगर मित्र मंडळाच्या वतीने काळे, तपासे, टाक, आडेपवार यांचा विशेष सत्कार

इमेज
  माणिकनगर मित्र मंडळाच्या वतीने काळे, तपासे, टाक, आडेपवार यांचा विशेष सत्कार  परळी l प्रतिनिधी माणिक नगर मित्र मंडळ व माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे स्नेही जणांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा माणिकनगर भागात सत्कार करण्यात आला. आपल्या प्रतिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल चंद्रकांत टाक, दिगंबर तपासे, तसेच नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीपदी निवड झालेले शंकरराव आडेपवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय काळे, चेअरमन दिनकरराव चाटे, ज्ञानेश्वरी पतपेढीचे संचालक देवराव कदम या मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा शिक्षक सुधीर गोस्वामी हे होते.  माणिक नगर भागातील ईश्वरलाल बाहेती यांच्या नवीन संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात विठ्ठल दंदे यांनी सत्कार मूर्तींच्या कार्याची उपस्थित सर्वांना ओळख करून दिली. दिगंबर तपासे, टाक यांनी अनेक वर्षे महावितरणमध्ये सेवा बजावली असून, ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर माणिकनगर येथील दत्तात्रय काळे यांची अखिल भारतीय मराठी पत्र

MB NEWS-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा : घाबरू नका...गांभीर्य बाळगा - मंगेश लक्ष्मणराव भोयटे

इमेज
 कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा : घाबरू नका...गांभीर्य बाळगा - मंगेश लक्ष्मणराव भोयटे परळी वैजनाथ, प्रतिनिधी----         प्रशासन व आरोग्य विभागाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो.नागरीकांनी भीती बाळगू नये, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क,सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन युवा नेते मंगेश लक्ष्मणराव भोयटे  यांनी केले आहे.          जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा सेकंड व्हेवमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी अकारण प्रवास करू नये,गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे व सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळे आदी ठिकाणी गर्दी टाळावी, बाहेर वावरताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत,हात स्वच्छ असल्याशिवाय कान, नाक,डोळे,यांना स्पर्श करू नये,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा.तसेच लहान मूल,वयोवृद्ध व गरोदर स्त्रियांची विशेष क

MB NEWS: कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला 'हा' निर्णय.....

इमेज
 कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला 'हा' निर्णय..... मंदिर दर्शनासाठी बंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी... कोविड १९ सेकंड व्हेव: गजानन महाराज संस्थान ने घेतला निर्णय घेतला आहे.आजपासुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना स्थिती भयावह होत आहे.या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या निर्णयाबाबत मंदिर संस्थान ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुचना प्रसारित केली आहे.

MB NEWS-परळी - अंबाजोगाई निकृष्ट रस्त्याचे बिल देण्यात येऊ नये - वसंत मुंडे

इमेज
  परळी - अंबाजोगाई निकृष्ट रस्त्याचे बिल देण्यात येऊ नये - वसंत मुंडे        परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... राष्ट्रीय महामार्ग 548 ब परळी अंबाजोगाई 2017 ला केंद्र सरकारने निविदा काढून  रस्त्याच्या कामाची संबंधित गुत्तेदाराला ऑर्डर देवून काम चालू करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु सर्व रस्ता दोन्ही बाजूने खोदून टाकल्यामुळे लोकांना जाण्या-येण्याचा व धुळीचा खूप त्रास होत होता कामाचा निकृष्ट दर्जा आणि वेळेच्या आत न काम झाल्यामुळे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार व राज्य सरकारकडे लेखी तक्रार  दाखल केली. त्यामुळे  निविदा रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले.  निकृष्ट दर्जाच्या कामाचे सर्व पुरावे संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाला देण्यात आले. त्यामुळे जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यात 153 कोटी वरून 134 कोटी रुपये चे काम 999999999 कोटी रुपये कमी दराने औरंगाबाद येथील ऐ जी सी आर एस बी आय पी एल जे व्ही कंपनीला मिळाले. जानेवारी मध्ये 2020 ला कामाची सुरुवात झाली आजतागायत काम धिम्या गतीने चालू असून आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत व त्यात माणसेही मृत्यू

MB NEWS- गंगाखेड, बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी

इमेज
  बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी   ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस मतदान संख्येनुसार निधी देण्याची आमदार गुट्टे यांनी केली होती घोषणा पालम येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बिनविरोध ग्रामपंचायतीस केले निधीचे वाटप गंगाखेड/प्रतिनिधी:          ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गावातील मतदान संख्येनुसार प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विकास निधी घोषित केला होता. बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस विकास निधीचा पहिल्या टप्प्याचे वितरण पालम येथे घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये करण्यात आले.         ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2020 21 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील एकूण 187 ग्रामपंचायती निवडणूका होऊ घातल्या होत्या यापैकी 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील 10, पालम तालुक्यातील 8 व पूर्णा तालुक्याती

औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक

इमेज
  औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक परळी वैजनाथ दि २० ( प्रतिनिधी ) :- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन ( वय‌ ९० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  परळी नगर परिषदेमध्ये जवळपास ४२ वर्ष परळीकरांची सेवा करून यशस्वीरित्या सामाजिक जबाबदारी पार पाडणारे तथा परळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन राहणार मलिकपुरा परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच परिसरात आणि नगरपरिषद परिसरात शोककळा पसरून हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात शेख खलील, शेख वहाब, शेख खैसर, शेख झाकेर, शेख जावेद, शेख जमील अशी सहा मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार असून शेख यासीन, शेख इम्तेहाज, शेख अखिल यांचे ते आजोबा होते. मयत शेख मोहम्मद हुसेन यांचेवर मलिकपुरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. माजी प्राचार्य शेख खलील सर आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे. ------------------------------

MB NEWS-कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश.

इमेज
  कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश. बीड, प्रतिनिधी.... 1. सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदानगरपंचायत यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मीक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. सदर ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) मधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी चेह-यावर मास्क परिधान केलेले नसतील, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल, त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. नोटीस देताना पुढील तपासणीत हीच परिस्थिती राहिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्थिती

MB NEWS- *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*

इमेज
 *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*      परळी वैजनाथ कोरोना विषयी सर्वत्र निष्काळजी पण होत असुन या मुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ती रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे त्यांनी केले आहे. राज्यात कांही दिवसा पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती.मात्र कोरोना विषयी सर्वत्र लोकांमध्ये निष्काळजी पण दिसुन येत आहे या निष्काळजी पणा मुळे कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असलेली गर्दी आणि या गर्दीत योग्य अंतर न ठेवणे,मास्क न वापरता होत असलेला लोकांचा सहभाग या मुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे ही वाढ रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे.

MB NEWS-समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी* *अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*

इमेज
 * समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी* *अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*  परळी, (प्रतिनिधी):- आद्य पत्रकार दर्पणकार, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा व नवा विचार देण्याचे कार्य केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने नवा विचार, नवी दिशा घेऊन आपले कार्य सुरू केले. मराठी वृत्तपत्रीय पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली. असे प्रतिपादन मराठवाडा साथी चे संपादक तथा आ.भा.मराठी पत्रकारीषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियाणी यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, शाखा परळी च्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी पीसीएन सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाड

MB NEWS-परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय

इमेज
  परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग राहतील सुरू…. परभणी, प्रतिनिधी.... परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.20) दिले. दरम्यान, इयत्ता दहावी व बारावी व्यतिरीक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षणक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बजावले आहेत. इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी नियमित शाळेत अध्

MB NEWS- *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •

इमेज
 *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ • .      परळी वैजनाथ : एमबी न्युज वृत्तसेवा..   भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज दुपारी परळीमध्ये येऊन मयत पुजा चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीनंतर बोलताना तृप्ती देसाई यांनी पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे.पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, तिला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.          परळी येथील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेटी दरम्यान आज शनिवारी(दि.२०) दुपारी त्या बोलत होत्या. पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय

MB NEWS-*जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; पालकमंत्री धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश*

इमेज
 *जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; पालकमंत्री धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश* परळी (दि. २०) ---- : गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फ़त तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला. या पावसाच्या तडाख्याने काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजी-पाला पिके यांसह अन्य पिकांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध महसूल मंडळामधून प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांकडूनही आपण याबाबत फोनवरून माहिती मागवली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  दरम्यान अवकाळी

MB NEWS-मौसम मस्ताना ,गरज नसताना.............! थंडीचा कडाका वाढला ठिकठिकाणी शेकोटया पेटल्या

इमेज
  मौसम मस्ताना ,गरज नसताना.............!  थंडीचा कडाका वाढला ठिकठिकाणी शेकोटया पेटल्या परळी - परळी शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून थंडीची प्रचंड लाट सुरू आहे. थंडीच्या कडाक्यामुळे नागरीकांनी आपली गरम वस्त्रे बाहेर काढली असून रात्रीच्या वेळी व सकाळच्या प्रहरी ठिकठिकाणी शेकोटया पेटल्याचे दृष्य दिसत आहे.               मागील दोन दिवसांपासून परळी शहर व तालुक्यात तापमानाचा पारा खाली आला आहे. दोन दिवसांपूर्वी वातावरणात प्रचंड उष्णता होती. अचानक आलेल्या पावसामुळे व त्यानंतर निर्माण झालेल्या या बोचऱ्या थंडीमुळे नागरीकांचे सर्दी, कफ व दम्याचे आजार उफाळून आले आहेत. सूर्यास्तानंतर थंडीचा तडाका अधिकच वाढत आहे. या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, जॅकेट आदि शरीरगरम ठेवनारे वस्त्र मोठ्या प्रमाणावर निघाले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी शेकोटया पेटलेल्या दिसत आहेत. आणखी काही दिवस परळीसह मराठवाडयात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.                उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागत असताना अचानक पाउस काय पडतोय, हिवाळ्यात पडते त्याप्रमाणे थ

MB NEWS-महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा

इमेज
  महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा परळी वैजनाथ, प्रतिनिधी             महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला             दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी वैजनाथ स्थानकात स्टेशन मॅनेजर श्री जितेंद्रकुमार मीना, उप-स्टेशन मॅनेजर श्री बनिसिंग मीना यांचा पुष्पहार घालून प्रवासी महासंघाचे जिल्हा संघटक सुधीर फुलारी व तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष श्री चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थित श्री श्रीकांत मलभागे, श्री अन्वर पाशा, श्री बाबू सूर्यवंशी या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला श्री फुलारी यांनी प्रवासी महासंघाची भूमिका थोडक्यात विशद केली. या कार्यक्रमानंतर परळी बस आगारात प्रवासी दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आगार प्रमुख श्री.अ. रा. बिडवे, कार्यशाळा अधीक्षक डी. पी. मुंडे, वाहतूक निरीक्षक पं. आ.

MB NEWS-जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा शिवजयंती निमित्त मास्क व सॅनिटायजरचे मोफत वाटप

इमेज
  जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा शिवजयंती निमित्त मास्क व सॅनिटायजरचे मोफत वाटप परळी(प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने गंगासागर नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी शिवजन्मोत्सव चे आयोजन करण्यात येत असून शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून इतरांना प्रेरणा देणारी आदर्श शिवजयंती साजरी करण्यात येते असते. या शिवजयंती च्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे शिवसेना नेते रवीदादा शिंदे, ,अभिजित धाकपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे हार शाल देऊन स्वागत करण्यात आले,         यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करून जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने घेण्या