परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

 सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन 



शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

सोनपेठ दि.२२(प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी विज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी व सरकारला सुबुद्धी लाभावी यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन दि.२६ रोजी आत्मक्लेष करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे. 

थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनाने विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिके उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळे शेतकरी आत्मघाता सारखा गंभीर मार्ग अवलंबत आहे. 

पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल बसुलीचा खंजीर खुपसत आहे. 

या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळे प्रचंड नैराश्यात आहेत. 

राज्य सरकारच्या या सक्तीच्या विज बिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच मृत पावलेल्या शेतकल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला सुबुद्धी मिळण्यासाठी दि.२६ रोजी विज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार सोनपेठ यांना देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे गणेश पाटील,सुधीर बिंदू ,विश्वंभर गोरवे,माऊली जोगदंड,गणेश पतंगे यांची उपस्थिती होती. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!