इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना

 मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन



राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना


परळी वैजनाथ, प्रतिनिधी : 

           मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी व परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहे.

           भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव (गाढे) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १९४० ला ते ‘डिस्ट्रीक्ट लँड रेकॉर्ड ऑफीसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू झाले. १९४७ ला ते ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत आले. ते १९५० साली आयएएस झाले. १९५३ ला ते नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५४ ला भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून भुजंगरावांची नेमणूक झाली. या आयोगाचा अहवाल सचिव म्हणून भुजंगरावांनी तयार केला. १९५६ ला राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर भुजंगराव मुंबई राज्यात आले आणि औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५९ला ते जनगणनेच्या कामासाठी भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६५ ला पुणे महानगर पालिकेकडे ते म.न.पा. आयुक्त म्हणून आले. १९६९ ला ते सचिव म्हणून मुंबईत आले. सुरूवातीला नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९६९च्या अखेरीस त्यांनी राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व १९७४ च्या अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले. 




प्रशासकीय कारकीर्द.....

           

        स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव कुलकर्णी हे १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भुजंगराव हे पीएच.डी. झालेले नसतानाही त्यावेळचे राज्यपाल अलियावर जंग यांनी विद्यापीठाला चांगला प्रशासक हवा म्हणून त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. भुजंगरावांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली.राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समितीवर सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या