MB NEWS-समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी* *अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*

 *समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी*



*अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*



 परळी, (प्रतिनिधी):- आद्य पत्रकार दर्पणकार, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा व नवा विचार देण्याचे कार्य केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने नवा विचार, नवी दिशा घेऊन आपले कार्य सुरू केले. मराठी वृत्तपत्रीय पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली. असे प्रतिपादन मराठवाडा साथी चे संपादक तथा आ.भा.मराठी पत्रकारीषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियाणी यांनी केले.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, शाखा परळी च्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी पीसीएन सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाडा साथी चे संपादक तथा बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियानी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक मोहन व्हावळे, अ.भा मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय अरबुने, तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार