MB NEWS-जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा शिवजयंती निमित्त मास्क व सॅनिटायजरचे मोफत वाटप

 जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा


शिवजयंती निमित्त मास्क व सॅनिटायजरचे मोफत वाटप


परळी(प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने गंगासागर नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी शिवजन्मोत्सव चे आयोजन करण्यात येत असून शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून इतरांना प्रेरणा देणारी आदर्श शिवजयंती साजरी करण्यात येते असते. या शिवजयंती च्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे शिवसेना नेते रवीदादा शिंदे, ,अभिजित धाकपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे हार शाल देऊन स्वागत करण्यात आले, 



       यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करून जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या वर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशासनाने कोव्हिडं 19 च्या संदर्भात दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सॅनिटायजर व मास्कचे वाटप करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष चौधरी, संयोजक बळीराम नागरगोजे, अशोक नानवटे, राम चव्हाण, रणजित जोगदंड, बालाजी कानडे, गणेश मोरे, प्रवीण राऊत, केतन जाधव, जगन्नाथ कदम, लखन चव्हाण, संतोष मस्के, यांनी परिश्रम घेतले व माऊली कदम, विक्रम गायकवाड, मोहनसिंग चव्हाण, दत्ता वावदाणे, अनिकेत बनसोडे, यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार