इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

 *स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !*



 *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले.



        परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीसांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नरेश हालगे ही व्यक्ती वारंवार फेसबुक व समाज माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य हिंदुत्ववादी महापुरुषांच्या संदर्भात जाणीवपूर्वक अपमानास्पद व भावना दुखावण्याच्या उद्देशाने मजकूर, छायाचित्रे प्रसारित करणे. या इसमाविरुद्ध सामाजिक शांतता भंग करणे, महापुरुषांची बदनामी करणे,भावना दुखावणे आदींसाठी कारणीभूत धरुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली आहे. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन व सोशल डिस्टंसिंग पाळत सावरकर प्रेमींनी निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या