इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक

 उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक



बीड (प्रतिनिधी) केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सामील झाल्या आहेत. दरम्यान या बंदला बीड जिल्हा व्यापारी महासंघासह बीड शहर व्यापारी महासंघानेही जाहीर पाठींबा दिला असून व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करावा असे आवाहन व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.


भारत बंदसंबंधी व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.24) बीड येथे एमआयडीसीतील मॉ वैष्णो पॅलेसमध्ये बीड जिल्हा व शहर व्यापारी महासंघाची व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी सीए भानुदास जाधव व सीए गोपाल लड्डा यांनी मार्गदर्शन केले. जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. या भारत व्यापार बंदला देशातील 40 हजार संघटना व 8 करोड व्यापार्‍यांनी पाठींबा दिला असून हे सर्व व्यापारी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जीएसटीच्या जाचक तरतुदी विरुद्ध लढा पुकारणार आहे.


सरकारला विनंती आहे की, त्यांनी मागच्या दाराने पुन्हा एकदा इनस्पेक्टर राज आणून भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटिस न देता माल जप्त करणे, जीएसटी रजिस्टरेशन रद्द करणे, रिटर्न्स भरू न देणे, गुन्हे दाखल करणे इत्यादी कलमा मध्ये संशोधन करून व्यापार्‍यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील असे कायद्यात बदल घडवून आणावे. म्हणजे व्यापार्‍यांना आपल्या व्यापार वाढी कडे लक्ष देता येईल. बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने भारत व्यापार बंदमध्ये सहभाग घेण्याचे ठरवले असून जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामीण, शहर संघटना व सर्व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या भारत व्यापार बंदमध्ये सहभाग नोंदवून आप आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील सर्व दुकाने बंद राहातील याची काळजी घ्यावी असे आवाहन बीड शहर व बीड जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.

परळी बंद चे आवाहन..........

    दरम्यान परळीमध्ये ही व्यापारी उद्या बंद पाळणार आहेत.याविषयी परळी बंद चे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या