औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक

 औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक



परळी वैजनाथ दि २० ( प्रतिनिधी ) :- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन ( वय‌ ९० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 

परळी नगर परिषदेमध्ये जवळपास ४२ वर्ष परळीकरांची सेवा करून यशस्वीरित्या सामाजिक जबाबदारी पार पाडणारे तथा परळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन राहणार मलिकपुरा परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच परिसरात आणि नगरपरिषद परिसरात शोककळा पसरून हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात शेख खलील, शेख वहाब, शेख खैसर, शेख झाकेर, शेख जावेद, शेख जमील अशी सहा मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार असून शेख यासीन, शेख इम्तेहाज, शेख अखिल यांचे ते आजोबा होते. मयत शेख मोहम्मद हुसेन यांचेवर मलिकपुरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. माजी प्राचार्य शेख खलील सर आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

----------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------


  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 


*MB NEWS यु ट्युब चॅनलला Subscribe नक्की करा.* 💢


https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg


---------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार