MB NEWS-मौसम मस्ताना ,गरज नसताना.............! थंडीचा कडाका वाढला ठिकठिकाणी शेकोटया पेटल्या

 मौसम मस्ताना ,गरज नसताना.............!



 थंडीचा कडाका वाढला ठिकठिकाणी शेकोटया पेटल्या


परळी - परळी शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून थंडीची प्रचंड लाट सुरू आहे. थंडीच्या कडाक्यामुळे नागरीकांनी आपली गरम वस्त्रे बाहेर काढली असून रात्रीच्या वेळी व सकाळच्या प्रहरी ठिकठिकाणी शेकोटया पेटल्याचे दृष्य दिसत आहे.

              मागील दोन दिवसांपासून परळी शहर व तालुक्यात तापमानाचा पारा खाली आला आहे. दोन दिवसांपूर्वी वातावरणात प्रचंड उष्णता होती. अचानक आलेल्या पावसामुळे व त्यानंतर निर्माण झालेल्या या बोचऱ्या थंडीमुळे नागरीकांचे सर्दी, कफ व दम्याचे आजार उफाळून आले आहेत. सूर्यास्तानंतर थंडीचा तडाका अधिकच वाढत आहे. या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, जॅकेट आदि शरीरगरम ठेवनारे वस्त्र मोठ्या प्रमाणावर निघाले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी शेकोटया पेटलेल्या दिसत आहेत. आणखी काही दिवस परळीसह मराठवाडयात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

              उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागत असताना अचानक पाउस काय पडतोय, हिवाळ्यात पडते त्याप्रमाणे थंडी जाणवते ,दिवसदिवस थंडीचा जोर कायम राहतो या सर्व परिस्थितीत समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर परिस्थिती चे विश्लेषण व प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.यामध्ये सर्वात अधिक व्हायरल होणारी प्रतिक्रिया म्हणजे"मौसम मस्ताना ,गरज नसताना.,............!" असे एका वाक्यात चपखल वर्णन करणारी. पोस्ट ठरली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !