आमच्या परळीचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे
परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी )
परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवले आहेत.आमच्या परळीचे भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील या शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी स्व.भुजंगराव कुलकर्णी यांच्या समवेत खा. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे संवाद साधत असतानाच्या छायाचित्रासह ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा