MB NEWS-राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयाचे आज पंकजाताई व प्रितमताई यांच्या हस्ते उद्घाटन

 राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयाचे 



आज पंकजाताई व प्रितमताई यांच्या हस्ते उद्घाटन

परळी (प्रतिनीधी)

 जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य तथा भाजपा नेते राजेश गित्ते यांच्या शिवाजी चौक भागातील लोकनेता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते बुधवार दि.24 रोजी होत असुन या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राजेश गित्ते यांनी केले आहे.

 जुनी पंचायत समिती बाजुस राजेश गित्ते यांचे लोकनेता संपर्क कार्यालय उभारले असुन या कार्यालयाचे बुधवार दि.24 रोजी सकाळी 10 वा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते तर भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे.मागील अनेक वर्षांपासुन शिवाजी चौक भागात राजेश गित्ते यांचे संपर्क कार्यालय असुन या कार्यालयाच्या माध्यमातुन असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.आज नविन जागेत लोकनेता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोरोनाचे सर्व नियम पाळून केले जाणार असुन या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राजेश गित्ते व परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार