इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी*

 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी*



सोनपेठ  (प्रतिनिधी) - 

         तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा  येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. 



         कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री एस.डी.जालमिले, आर. बी.जोशी, ए.एस.चाटे, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, सोमनाथ सातपुते,दिलीप व्हावळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या