MB NEWS-माणिकनगर मित्र मंडळाच्या वतीने काळे, तपासे, टाक, आडेपवार यांचा विशेष सत्कार

 माणिकनगर मित्र मंडळाच्या वतीने काळे, तपासे, टाक, आडेपवार यांचा विशेष सत्कार 





परळी l प्रतिनिधी

माणिक नगर मित्र मंडळ व माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे स्नेही जणांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा माणिकनगर भागात सत्कार करण्यात आला.

आपल्या प्रतिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल चंद्रकांत टाक, दिगंबर तपासे, तसेच नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीपदी निवड झालेले शंकरराव आडेपवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय काळे, चेअरमन दिनकरराव चाटे, ज्ञानेश्वरी पतपेढीचे संचालक देवराव कदम या मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा शिक्षक सुधीर गोस्वामी हे होते. 

माणिक नगर भागातील ईश्वरलाल बाहेती यांच्या नवीन संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात विठ्ठल दंदे यांनी सत्कार मूर्तींच्या कार्याची उपस्थित सर्वांना ओळख करून दिली. दिगंबर तपासे, टाक यांनी अनेक वर्षे महावितरणमध्ये सेवा बजावली असून, ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर माणिकनगर येथील दत्तात्रय काळे यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर परिषदेचे बांधकाम सभापती शंकरराव आडेपवार म्हणाले की, ना.धनंजय मुंडे यांनी हाकलेला विकासाचा रथ पुढे नेणार असून, परळीतील विविध भागांतील रस्ते आणि नाल्या करण्याला माझे प्राधान्य असेल. नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमच्या कामाचे स्वरूप असणार आहव. सत्काराला उत्तर देतांना श्री दत्तात्रय काळे म्हणाले की, परळी शहराच्या दृष्टीने माणिक नगर हा भाग विशेष असून या भागातील सर्व नागरिक अतिशय प्रेमळ आणि माणुसकी भाव असलेली माणसं आहेत. एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हा येथील नागरिकांचा स्थायी स्वभाव गुण आहे. त्यामुळे सत्कार झाल्याबद्दल त्यांनी कार्यक्रमाच्या संयोजकांचे आभार व्यक्त केले. नवनाथ क्षीरसागर यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर गोस्वामी यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले व त्यांच्या कार्याचा परिचय उपस्थित सर्वांना करून दिला.

माणिक नगर येथे आयोजित विशेष सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत गरड, ईश्वर राऊत, बाळा शंकूरवार, हरीश सेठ नाथानी, मधुकर कुलकर्णी, प्रकाश पोरे, शाम गाडेकर, रामेश्वर बर्डे, आबा धाकपाडे, विजय दहिवाळ, नागेश चोपडे, धर्मराज खोसे, बंडू पंडित, गजानन दंदे, गणेश सदरे, गजेंद्र गडेकर, दत्ता सानप, गणेश सूर्यवंशी, गोविंद पोरे, निखिल शास्त्री, बालाजी साळुंके, नासेर शेख, अभिजित गडेकर, किशोर दंदे, बालाजी गर्जे, शिवाजी केसापुरे, विजय जाधव, लटंगे, अजय सुपले, बंडू शिंदे, वैजनाथ गडेकर, अतुल गडेकर, आबा शिंदे, श्रीकांत बाहेती, दिनेश भंडारे, गोविंद उदावंत, वैभव टाक, नवनाथ पांचाळ, राजाभाऊ शिंदे, कृष्णा चोपडे, नामदेव पांढरे, कृष्णा पवार, दत्ता म्हाळगी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार