MB NEWS- *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •

 *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई*

• _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •


.

     परळी वैजनाथ : एमबी न्युज वृत्तसेवा..

  भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज दुपारी परळीमध्ये येऊन मयत पुजा चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीनंतर बोलताना तृप्ती देसाई यांनी पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे.पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, तिला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         परळी येथील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेटी दरम्यान आज शनिवारी(दि.२०) दुपारी त्या बोलत होत्या. पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे यासाठी सीबीआय चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या.


---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 

*MB NEWS यु ट्युब चॅनलला  Subscribe नक्की करा.* 💢

https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !