MB NEWS- गंगाखेड, बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी

 बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी


 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस मतदान संख्येनुसार निधी देण्याची आमदार गुट्टे यांनी केली होती घोषणा


पालम येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बिनविरोध ग्रामपंचायतीस केले निधीचे वाटप


गंगाखेड/प्रतिनिधी:

         ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गावातील मतदान संख्येनुसार प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विकास निधी घोषित केला होता. बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस विकास निधीचा पहिल्या टप्प्याचे वितरण पालम येथे घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये करण्यात आले.

        ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2020 21 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील एकूण 187 ग्रामपंचायती निवडणूका होऊ घातल्या होत्या यापैकी 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील 10, पालम तालुक्यातील 8 व पूर्णा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचा समावेश होतो. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ग्रा.पं. देवकतवाडी, गोदावरी तांडा, गौळवाडी, कातकरवाडी, तांदुळवाडी येथे सभामंडप बांधकाम करणे प्रत्येकी 11 लक्ष, डोंगरपिंपळा येथे सभामंडप बांधकामाकरिता 21 लक्ष व खादगाव येथे सभामंडप बांधकाम करणे 25 लक्ष रुपये तसेच पालम तालुक्यातील ग्रा. पं. खुरलेवाडी, दुटका, गुंज व खरी येथे सभामंडप बांधकामाकरिता प्रत्येकी 11 लक्ष रुपये एवढा वाडी येथे सभामंडप बांधकाम करणे त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत बरबडी, ईटलापुर माळी व रुंज येथे सभामंडप बांधकामाकरिता प्रत्येकी 11 लक्ष रुपये निधी स्थानिक आमदार विकास निधी मधून आ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पहिल्या टप्प्यात 14 बिनविरोध ग्रामपंचायतीस 178 लक्ष रुपये एवढा स्थानिक आमदार विकास निधी देऊन निवडणुकीत दिलेला शब्द आ. डॉ. गुट्टे यांनी पाळण्याचे दिसून येते. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 11 बिनविरोध ग्रामपंचायतीस 121 लक्ष रुपये विकास निधी देण्यात येणार असल्याचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आमदार गुट्टे यांनी पाळला असल्याने, दिलेला शब्द पाळणारा आमदार आहे अशी जनमानसातून चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 

*MB NEWS यु ट्युब चॅनलला  Subscribe नक्की करा.* 💢

https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !