MB NEWS-महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा

 महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

            महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, बीडजिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने रथसप्तमी राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला

           दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी वैजनाथ स्थानकात स्टेशन मॅनेजर श्री जितेंद्रकुमार मीना, उप-स्टेशन मॅनेजर श्री बनिसिंग मीना यांचा पुष्पहार घालून प्रवासी महासंघाचे जिल्हा संघटक सुधीर फुलारी व तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष श्री चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थित श्री श्रीकांत मलभागे, श्री अन्वर पाशा, श्री बाबू सूर्यवंशी या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला श्री फुलारी यांनी प्रवासी महासंघाची भूमिका थोडक्यात विशद केली. या कार्यक्रमानंतर परळी बस आगारात प्रवासी दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आगार प्रमुख श्री.अ. रा. बिडवे, कार्यशाळा अधीक्षक डी. पी. मुंडे, वाहतूक निरीक्षक पं. आ. तुंबरफळे व उपस्थित सर्व वाहक, चालक, तंत्रज्ञ, यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला संचालन तालुका सहसचिव प्रा.सौ.चेतना गौरशेटे यांनी केले .या दोन्ही कार्यक्रमास प्रवासी महासंघाचे व ग्राहक पंचयात चे पदाधिकारी सुधीर फुलारी, चंद्रकांत अप्पा समशेट्टे प्रा.सौ. चेतना गौरशेटे , डॉ. दीपक पाठक, प्रा. एस. एल. देशमुख,उत्तम रानभरे, विजय मिसाळ, सचिन फुलारी, श्रीवर्धन फुलारी व सदस्य उपस्थित होते



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार