MB NEWS-परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय

 

परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय



इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग राहतील सुरू….

परभणी, प्रतिनिधी....

परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.20) दिले.

दरम्यान, इयत्ता दहावी व बारावी व्यतिरीक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षणक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बजावले आहेत.

इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी नियमित शाळेत अध्यापनाचे कार्य व आवश्यकती कामे करावित. इतर सर्व शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 

*MB NEWS यु ट्युब चॅनलला  Subscribe नक्की करा.* 💢

https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !