इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय

 दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय*



परळी (प्रतिनिधी):-

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्य बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीत परळी वैजनाथ येथील दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मूंडे हा द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे ‌.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली.

या निवड चाचणीत 74 किलो वजन गटात तिसऱ्या फेरी अंतीम कुस्ती मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या त्याच्या यशाबद्दल परळी येथील दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री देविदास राव कावरे सर,मार्गदर्शक सुभाष नाणेकर सर,शिव शंकर कराड,प्रशिक्षक प्रा.अतुल दुबे सर प्रा.डॉ जगदीश कावरे सर यांच्या सह परळी तालुक्यातील कुस्ती प्रेमिनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या