MB NEWS-कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश.

 कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी





असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश.

बीड, प्रतिनिधी....

1. सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदानगरपंचायत यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मीक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. सदर ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) मधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी चेह-यावर मास्क परिधान केलेले नसतील, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल, त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. नोटीस देताना पुढील तपासणीत हीच परिस्थिती राहिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्थिती राहिली तर संबंधित प्रतिष्ठानावर पोलीस विभागाने गुन्हा दाखल करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी नाक व तोंडावर मास्क न वापरणान्या व्यक्तीवर प्रथम वेळी रु.500/- व पुन्हा आढळल्यास रु.1000/ - एवढा दंड आकारावा.

2. बीड जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात वरील प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या दंडाची वसुली ग्रामस्तरावरील ग्रामसेवक/ ग्रामपंचायत तसेच पोलीस अधीक्षक बोड यांनी नेमुन दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.

3. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट - उपहारगृहे, बंक्वेट हॉल इ. ठिकाणी नागरीकांना संचार करताना मास्क व संनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहिल त्याबाबत संबंधीत विभागाने नेमणूक केलेल्या पथकाने विशेष मोहिम राबवून तपासणी करावी, सदर ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधीत विभागाने कठोर कारवाई करावी.

4. गर्दी होणारे कोणतेही खाजगी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधीत पोलोस स्टेशन मधून रितसर परवानगी प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. तसेच कार्यक्रमस्थळी कोव्हीड 19 निर्देशांचे पालन होते किंवा नाही. याबाबतीत आयोजकांवर बंधनकारक राहील. कोव्होड 19 संदर्भातील तरतुदीचे कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास साथरोग अधिनियम आणि तत्सम कायदेशीर तरतुदीनुसार संबंधीत स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करावी.

 5. बीड जिल्हा कार्यक्षेत्रातील नगरपरिषद,नगरपंचायत/ ग्रामपंचायत हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) घोषित करणेची कार्यवाही संबंधित तहसिलदार यांनी करावी. तसेच संबंधित ठिकाण निर्जेतुकीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे. जेणेकरुन संसर्गाचा प्रसार रोखणे सोपे होईल.

6. जिल्ह्यातील कोणते सीसीसी सेंटर बंद आहेत व कोणते सीसीसी सेंटर चालू करावे लागणार आहेत यासंबंधी पूर्वतयारी करावी, वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून संबंधित आवश्यक कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हॉस्पीटल, कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध राहतील .सर्व उपकरणे सुस्थितीत असतील याची खातरजमा संबंधीतांनी करावी व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.

7.बीड जिल्हा कार्यक्षेत्रातील नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पध्दतीने तपासण्या कराव्यात. प्रत्येक रुग्णांचे किमान 30 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल त्या ठिकाणी निदान मायक्रो सिलिंग तरी करावे. पेशंटच्या घरातील सर्वांची कोव्हीड तपासणी करावी. वेगाने प्रसार करणाऱ्या (सुपर स्प्रेडर) संवर्गातील व्यक्तीची वारंवार तपासणी करुन सकारात्मक चाचणी आल्यास विलगीकरण कक्षात ठेवावे. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या उराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सर्व सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम घेताना शासनाने ठरवून दिलेल्या SOP प्रमाणेच कार्यवाही करणे बंधनकारक असेल.

8. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प बीड, यांनी अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालय, अंबाजोगाई यांचे समवेत सर्व खाजगी प्रैक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक आयोजित करावी. सदर बैठकीत ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील व त्यांना असे वाटत असेल की रुग्णाला कोव्हीड 19 रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत तर त्यांनी अशा रुग्णांना ताबडतोब कोव्हीड 19 ची टेस्ट करुन, घेण्यासंबंधीच्या सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यास उपलब्ध असलेले सर्व व्हेंटिलेटर्स चालू आहेत किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, ठराविक अंतराने, हात साबणाने स्वच्छ धुणे याविषयो व्यापक प्रमाणात जनजागृती करावी.

9. सर्व आगार प्रमुख, राज्य परिवहन महामंडळ जिल्हा बीड यांनी बस स्थानकांवर तसेच बसेस मध्ये प्रवाशांकडून मास्कचा वापर व कोव्हीड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन होण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी आणि बसेसच्या चालक व वाहकांनाही त्याअनुषंगाने आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

10. सर्व तहसिलदार यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या सीसीसी सेंटर मधील कोव्हीड 19 च्या अनुषंगाने उपलब्ध झालेली साधनसामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करुन उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 

11. पोलीस विभाग, तहसिलदार, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी मास्क वापराच्या सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त पथकांची स्थापना करुन सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवरुन जाणार्या वाहनांची तपासणी करावी व सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर, वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही करावी.  

12. कोव्हीड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबाबत संबंधित मंदिराचे व्यवस्थापक संस्थान यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी तसेच पास देताना 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुले यांना तसेच मास्क न वापरणार्या भावीकांना पासेस देण्यात येवु नयेत.तसेच धार्मिक स्थळे/प्रार्थना स्थळे या ठिकाणी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या SOP चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. 

13. शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांची गर्दी होऊ नये त्याअनुषंगाने सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. सदर नोडल अधिकारी यांनी कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांना पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यालयांमध्ये येण्याची आवश्यकता भासू नये व कार्यालयामध्ये अभ्यागतांची गर्दी होऊ नये याअनुषंगाने त्यांची निवेदने, अर्ज यांवर कार्यवाही करावी. 

14. सद्यस्थितीत सार्वजनिक परिवहन व्यवस्था (रेल्वे. बस) द्वारे प्रवाशांची जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा / आंतरराज्य आवक-जावक सुरु झालेली असल्याने अशा प्रकारे प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी ताप, सर्दी, खोकला इ. कोव्हीड 19 सदृश लक्षणे दिसून आल्यास तात्काळ स्वत:हुन गृह विलगीकरणात (Home Quarantine) रहावे व तात्काळ कोव्हीड 19 ची चाचणी करुन घ्यावी. 15. स्थानिक प्राधिकरणाने कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रसाराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणेसाठी वर्तमानपत्रातून व प्रसारमाध्यमाद्वारे प्रचार करण्यात यावा.

             तरी दिनांक 16 फेब्रुवारी. 2021 रोजी झालेल्या राज्यस्तरीय दुरचित्रवाणी परिषदेत निर्देशीत केल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 

*MB NEWS यु ट्युब चॅनलला  Subscribe नक्की करा.* 💢

https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !