पोस्ट्स

MB NEWS-लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी* _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_

इमेज
 * लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*  _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_ बीड । दिनांक २६। लाॅकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणारांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे, तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय गै

MB NEWS-एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इमेज
  एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई परभणी.......         अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्वीकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे आज गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.         याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी️ 1 लाख रूपये लाच मागितली होती. यातील रेल्वे पोलीस हवालद

MB NEWS-लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

इमेज
  लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात ! कायदेभंगाचा गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत- आ.धस  आष्टी, प्रतिनिधी......       लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात उतरले आहेत.व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसाला लाॅकडाऊनचा प्रचंड त्रास होतो.यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध करत गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत असे आ.धस यांनी सांगितले.        याबाबत तहसीलदार यांना आ.सुरेश धस यांनी निवेदन दिले.लाॕकडाऊनला आ.सुरेश धस यांनी तीव्र विरोध करत व्यापा-यांसह निवेदन देण्यात आले.सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपुर्ण ताकदनिशी मी उभा आहे.वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्यांची मला सवय असल्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी यावेळी दिला आहे.

MB NEWS-लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक

इमेज
  लॉकडाऊनच्या  विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक बीड, प्रतिनिधी....     बीड जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.परंतु केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास व्यापारी संघटना निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.  सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना  बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. त्यांचा विचार न करता  सरळ लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक व्यापारी या गोष्टीमुळे परेशान होणार तर आहेच परंतु आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहेेत. जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस  व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत.आदेशात काही  व्यापार्‍यांना व्यवसाय करण

MB NEWS-बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश   बीड,दि.24(जि.मा.का.):- जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे  परवानगी शिवाय बीड जिल्हयात  प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्हयात  येणाऱ्या सर्व सिमा सिल, बंद करण्याचे निर्देश श्री. रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  मुभा देण्यात आलेल्या काहींना  वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या क

MB NEWS-बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी

इमेज
  बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी बीड.......       आज बीड अधीकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले की बीड जिल्ह्यात (दि.२५.०३.२०२१ च्या मध्यरात्रीपासून) दि.२६.०३.२०२१ ते ०४.०४.२०२१ बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन असेल असे आदेश जारी केले त्यामध्ये कोणता व्यवसाय चालु राहतील ते खालील प्रकारे आहे. १. सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपुर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील .  २. उपहारगृह , सर्व अनुज्ञप्त्या , रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल्स , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . ( कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण , नाष्टा , चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून )  ३. सर्व केशकर्तनालय / सलुन / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील .  ४. शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील .  ५. सार्वजनिक व

MB NEWS-बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन

इमेज
  बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन  बीड.....बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली करत असल्याने हा आकडा वाढतो आहे. बीड जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांचे दुकान सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने अखेर बुधवार पासून बीड जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप  यांनी घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. हा लॉक डाऊन 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांसाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे. यामुळे 25 मार्चला सायंकाळी ७ वाजता बंद केलेली दुकाने ५ अप्रीलाच उघडणार आहेत.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाचा संसर्ग ; संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

इमेज
  ना.धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाचा संसर्ग ; संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन   मुंबई..... राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त धनंजय मुंडे यांच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आले आहे. दरम्यान, काळजीचे कारण नाही.सर्वांनी काळजी घ्यावी,सोशल डिस्टंसिंग पाळत कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिक यांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे.  

MB NEWS- *काळरात्र: बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र' !* ⬛ *_परळीच्या बसस्थानकात घडली ह्रदयद्रावक घटना_* ⬛

इमेज
 *काळरात्र: बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र' !*  ⬛ *_परळीच्या बसस्थानकात घडली ह्रदयद्रावक घटना_* ⬛ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.…     एक बाप आपल्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन परळीच्या बसस्थानकात आला.रात्र झाली म्हणून बसस्थानकात च प्लॅटफॉर्मवर चिमुकल्याला छातीशी कवटाळून झोपला.पण बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र ' हरवल्याची ह्रदयद्रावक घटनापरळीच्या बसस्थानकात दि. २१ रोजी रात्री घडली. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख शाहेद शेख उस्मान रा.बरकतनगर परळी वैजनाथ हा इसम बाहेरगावाहून दि. २१ रोजी रात्री परळीच्या बसस्थानकात उतरले.त्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर अंथरुन टाकुन आपल्या तीन ते चार वर्षांच्या मुलाला घेऊन तो इसम झोपी गेला.दि.२२ रोजी सकाळी नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या या इसमाला व मुलाला बघितले.दिवस उजाडुन बराच वेळ झालेला असतानाही हे झोपडीतून उठले नाही हे बघून नागरीकांनी जवळ जाऊन बघितले

MB NEWS-वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे

इमेज
  वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - लाॕकडाऊनचे सारे नियम सहिष्णू आहेत म्हणून मंदिरांनी किती दिवस सहन करायचे.देव आणि भक्त यांच्यात कायमचा दुरावा निर्माण करायचा आणि लोकांची भावना देवधर्मावरची उडवायची हाच हेतू यातून प्रकर्षाने मंदिर बंद ठेवून प्रत्ययाला येतो आहे काय? असा सवाल ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी प्रशासनाला विचारला आहे .भाविक भक्तांना त्यांच्या उपास्य देवतेच्या आराधनेपासून कडक निर्बंध लादून अगोदरच वंचित ठेवलेले आहे.शंभर फुटावरुन बेल, फुल,गंध ,अक्षता याचेवर कडक नियमावली केली आहे . भक्तांना दूर अंतरावरुन दर्शन घेण्याची सक्ती आहेच.परंतु देवधर्माची ओळख पण बुडली जावून नास्तिकवाद आपसूकच स्विकारला जाईल या उद्देशाने हे कुटील डाव टाकण्याचे पाप तर होत नाहीये ना.अशी शंका उपस्थित करून याचा निषेध कीर्तनकार तथा संतवाङमयाचे संशोधक आणि वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केला आहे. त्वरित वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी त्यांनी केली असून मंदिर बंद असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत प्रशासनाने भावि

MB NEWS-शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२

इमेज
  शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२   परळी वैजनाथ /प्रतिनिधी..........        शहरातील मुख्य रस्त्यावर जणू अस्ताव्यस्त वाहतुकीला  कायदेशीर परवानगीच देउन टाकली आहे की काय अशी अवस्था सध्याआहे. ठिकठिकाणी फळांचे गाडे रस्त्यावर मनाला येईल त्या ठिकाणी कधीकधी तर रस्त्यावर मधोमध बिनदिक्कतपणे लावलेले असतात. वाहतूक कोंडी झाली तरी गाडा थोडा सुद्धा जागेवरून हलवण्याची तसदी ही घेतली जात नाही. उलट वाहनधारकांना या गाडेवाल्यांच्या रोषाला निमुटपणे सहन करण्याची वेळ कित्येकदा येते. सुरक्षीत वाहतूकीसंदर्भात कोणीच गंभीर नसल्याचे भयावह चित्र बघायला मिळत असते.. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा पी -१ पी-२ ची  पार्किंग व्यवस्था लावण्यात येणार आहे.                   परळी शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले  असून, सुरक्षीत वाहतूकीसाठी  पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हातगाड्या व वाहनांचे रस्त्यांवर होणारे अडथळे दुर करण्यासाठी  उपाययोजना करण्याची गरज आहे.मोंढा,  एकमिनार चौक, राणी लक्ष्मीबाई टॉ

MB NEWS-देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार

इमेज
  देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार सातारा : कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत असल्याचा आरोप वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलंय.    सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. तर पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी उगारलेले हे हत्यार डोकेदुखी ठरणार आहे, असे दिसत आहे. काय म्हणाले बंडातात्या कराडकर? कोरोनाच प्रस्त वाढत नाही तर तसं भासवलं जातंय. लोकसंखेच्या प्रणाणात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूप कमी आहे. सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो. केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत. देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी. पैठणच्या उत्सवा दिवशी शुक शुकाट असणे

MB NEWS- *📣पुढील काही वर्ष आपल्याला मास्क घालूनच फिरावं लागेल; तज्ज्ञांचा इशारा*

इमेज
 *📣पुढील काही वर्ष आपल्याला मास्क घालूनच फिरावं लागेल; तज्ज्ञांचा इशारा* ------------------------------------------  जगभरामध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र एकीकडे लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असं असतानाच आता इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. मेरी रॅमसे यांनी एक मोठा दावा केलाय. पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असं डॉ. रॅमसे म्हणल्या आहेत. डॉ. रॅमसे यांनी जगभरातील लोकांना आता काही प्रमाणात निर्बंधांची सवय लावणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे. पुढील काही वर्षांसाठी आपल्याला हे नियम पाळावे लागणार आहेत. या निर्बंधांच्या आधाराचे आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार आहे. सरकारलाही कोणतेही निर्

MB NEWS-फुलचंद कराड यांनी इशारा देताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी

इमेज
  फुलचंद कराड यांनी इशारा देताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचे विज तोडणीची मोहीम जोरदार हाथी घेतल्याने तालुक्यातील अनेक गाव अंधारात गेली होती. गाव गावचा पाणी प्रश्न निर्माण झाला होता.परतु भाजपा नेते फुलचंद कराड यांनी परळीचे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा  काढला होता. लिंबूटासह तालुक्यातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.            शेतकऱ्यांना बिलाबाबत सहकार्य करा आणि तात्काळ बंद असलेली वीज सुरू करा अन्यथा उद्या व्यापक स्वरूपात आंदोलन उभे होईल आणि हजारो शेतकरी विजवीतरण कार्यालयासमोर येतील असा इशारा फुलचंद कराड यांनी दिला होता. इशारा देताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून याबाबत तोडगा काढला व बिलात सवलत देऊन तात्काळ पैसे भरून घेतले व विजजोडणी केली. फुलचंद कराड यांच्या आंदोलनाला यश आले असून, यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व दुष्काकाळाच्या झळा सोसत असणाऱ्या शेतकऱ्यांना बेवाजवी बिले दिली गेली आहेत. एकीकडे बेवाजवी बिल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आ

MB NEWS-वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद

इमेज
  वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद परळी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी वाढवण्यात आला असून, येत्या 04 एप्रिलपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, बीड यांनी याबाबत आज नवे आदेश काढले आहेत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे गर्दी होण्याची श्यक्यता लक्षात घेता महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंदचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. पुढील 04 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर जरी बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू असणार आहे.

MB NEWS- *भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर*

इमेज
 भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आवडत्या मायबोली या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून येत्या रविवार पासून सलग तीन दिवस  दि 21 22 आणि 23 मार्च 2021 पर्यंत. थोर किर्तनकार वै. रामेश्वर महाराज गुट्टे परळी वै. यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राज्यस्तरीय भव्य किर्तन महोत्सव परळी-वैद्यनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पाचवे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे यांच्या सुमधूर आवाजात उत्कृष्ट किर्तनसेवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील  आपुला तो एक देव करूनी घ्यावा या अंगावरील चिंतनीय किर्तनसेवा जिवनात सुख पाहिजे असेल तर जगात फक्त देव आपलासा करावा लागतो अशा पद्धतीने सोनवणे महाराज यांनी अतिशय मार्मिक चिंतन अभंगातून आपल्या समोर मांडले आहे तरी सर्वांनी या मायबोली वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या किर्तन रंग या मालिकेतील हे किर्तन पुष्प ऐ

MB NEWS-सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा*

इमेज
  सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा बीड/प्रतिनिधी..........     जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी उद्या दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे किंवा जिल्ह्यात संपूर्ण लाॅकडाउन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.       जिल्ह्यातील सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक ०१.०३.२०२१ रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकी मध्ये हमी दिली होती की, सर्व व्यापारी १५ मार्च २०२१ पर्यंत अॅन्टीजेन/आरटीपीसीआर टेस्ट करून घेतील, १५ मार्च २०२१ नंतर जो व्यापारी अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट न करता आपला व्यवसाय सुरु करेल त्यावर फौजदारी तसेच दंडात्मक कार्यवाही अनुसरावी. तसेच रेस्टॉरंट,बार, भाजीपाला- फळ विक्रेते यांचे प्रतिनीधी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून सर्व नियम पाळूनच व्यवसाय केले जातील लागू केलेले निर्बध शिथिल करण्यात यावेत अशी विनंती केली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली. परंतु प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, जिल

MB NEWS-बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे

इमेज
बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे *_कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव_* बीड । दिनांक १९। बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ

MB NEWS-शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे परळी /प्रतिनिधी महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपांची वीज तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा  प्रा. टी. पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.    मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक  प्रा.टी. पी.मुंडे (सर)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प.सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनीसुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते आणि 100 युनिट पर्यंत विज बिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही. शेतकरी' शेतमजू

MB NEWS-अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान

इमेज
  अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान परळी/प्रतिनिधी.... इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सतर्फे देण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) परीक्षेत परळीचा युवक अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला राष्ट्रीय पातळीवरील श्रेणी प्राप्त करून फेलोशिप मिळाली आहे. अमेय लातूरमधील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर परळीतील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांचा मुलगा, निवृत्त ज्येष्ठ अधिष्ठाता (डीन) डॉ. जे. जे. देशपांडे यांचा नातू आहे. या यशाबद्दल अमेयचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

MB NEWS -परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी

इमेज
  परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी  परळी वैजनाथ /प्रतिनिधी...         गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे.वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.         याबाबत परळी वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता आंबडकर व देशमुख मॅडम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या

MB NEWS-*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश*

इमेज
*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश* परळी वै... _प्रतिनिधी_        प्राचार्या अर्चना दिंगबरराव नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश यांनी  संपादण केले आहे.मधुकर गित्ते यांच्या सौभाग्यवती त्या परळी येथील यशवंतराव चव्हाण या महाविद्यालयत प्राचर्या  या पदावर कार्यरत असुन सौ.अर्चना यांच्या या उज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत..

MB NEWS-डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन

इमेज
  डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन बीड : प्रतिनिधी संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा प्रचारक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचे नामाचा महिमा विशद करणारे हरिकीर्तन दि. १९ व २० मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत प्रक्षेपित होणार आहे. श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त संत मीराबाई संस्थान, पाटोदा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफताना गुट्टे महाराजांनी संत एकनाथांच्या ‘आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी आहे सर्व’ या अभंगावर निरूपण केले होते. नामाचा व संतांचा महिमा विशद करणाऱ्या या कीर्तनाचे ‘शेमारु मराठीबाणा’ या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत दि.१९ व २० रोजी सकाळी ८ वाजता प्रक्षेपण तर दि.२० व २१ रोजी सकाळी ७ वाजता पुन;प्रक्षेपन होणार आहे. या कीर्तनाचा भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संत मीराबाई आईसाहेब संस्थान, प्रमोदजी रणनवरे व संतोषजी साखरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS-परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर

इमेज
  परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर --------------------------------------------------------------------------- परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणीवान गौरव महासंमेलन एप्रिलमध्ये पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनामध्ये परळी येथील गेली 30 वर्षापासून आपल्या पत्रकारितेचा वेगळा ठसा उमटवणारे परळी समाचारचे संपादक आत्मलिंग प्रभुअप्पा शेटे यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार” देण्यात येणार असल्याचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. त्यांनी पत्रकात सांगितले की, डिसेंबर 2020 मध्येच सर्वस्तरातील नामांकित व्यक्तींना मोठ्या समारंभामध्ये हा पुरस्कार देण्याचे ठरले होते. परंतु कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे हा भव्य असा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून एप्रिमध्ये शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन हा पुरस्कार सोहळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे. तसेच परळी समाचारचे संपादक

MB NEWS-परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा सारखा लपंडाव ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस

इमेज
  परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा रोजच सारखा लपंडाव ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून विज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. विज वितरण कंपनी दिवसभरात किती वेळेस लाईट घालवते याचे काही वेळापत्रक राहिलेले नाही. थकबाकीदार ग्राहकांची लाईट कट करण्यासाठी दिवसात 20-25 वेळा लाईट बंद करण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली परमिट घेवून विज कट करतात पण विज कट करण्याचे वेळापत्रक काही केलेले नाही. विज कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले गेले आहेत. वितरण कंपनीने विज घालवण्याचे वेळापत्रक तयार करून ग्राहकांसाठी ते वृत्तपत्रात छापली पाहिजे. वितरण कंपनी कार्यालयात एखाद्या ग्राहकाने फोन केला तर तेथील कर्मचार्‍यांना लाईट पुरवठा सुरू आहे कि नाही हे माहिती नसते हे विशेष.