MB NEWS-शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे



परळी /प्रतिनिधी


महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपांची वीज तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा  प्रा. टी. पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.


   मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक  प्रा.टी. पी.मुंडे (सर)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प.सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनीसुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते आणि 100 युनिट पर्यंत विज बिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही. शेतकरी' शेतमजूर ,दलित, अल्पसंख्यांक यांच्यासाठी गेली चाळीस वर्ष आपण संघर्ष करीत आहोत. शेतकऱ्यांवर जर अन्याय झाला तर तो आपण सहन करणार नाही असे लोकनेते प्रा. टी. पी. मुंडे सर यांनी सांगितले.


   ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात वीज तोडणी चालू आहे त्यामुळे पिकांना जोपासायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी,दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात शेतकऱ्यांजवळ थकबाकी भरण्यास पैसे नाहीत दरम्यान वाण प्रकल्पात पाणीसाठा मुबलक असतानाच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली असतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट होत आहे. यातून महावितरणच्या अधिकारी यांनी तोडगा काढुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी दिला आहे.या बैठकीला परिसरातील कृषी पंप धारक शेतकरी ,सरपंच, परिसरातील नेते ,सेवा सोसायटीचे चेअरमन आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !