MB NEWS-परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर

 परळी येथील जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार ‘दर्पणरत्न’ पुरस्कार जाहीर


---------------------------------------------------------------------------

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणीवान गौरव महासंमेलन एप्रिलमध्ये पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनामध्ये परळी येथील गेली 30 वर्षापासून आपल्या पत्रकारितेचा वेगळा ठसा उमटवणारे परळी समाचारचे संपादक आत्मलिंग प्रभुअप्पा शेटे यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार” देण्यात येणार असल्याचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.

त्यांनी पत्रकात सांगितले की, डिसेंबर 2020 मध्येच सर्वस्तरातील नामांकित व्यक्तींना मोठ्या समारंभामध्ये हा पुरस्कार देण्याचे ठरले होते. परंतु कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे हा भव्य असा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून एप्रिमध्ये शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन हा पुरस्कार सोहळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे.

तसेच परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांचे सर्व कार्य तपासूनच व त्यांचे सामाजिक, पत्रकारितेतील, धार्मिक तसेच लॉकडाउन मध्ये आपल्या वृत्तपत्रातून विविध प्रकारे कोरोना संदर्भात लिखान केलेले आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनेच्या माध्यमातून ही त्यांचे कार्य अमूल्य असेच आहे. म्हणून त्यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार दर्पणरत्न हा पुरस्कार” जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मलिंग शेटे यांना विरशैव समाजाच्या वतीने चांगले कार्य केल्याबद्दल लातूर येथे समाजभूषण पुरस्कार नांदेड येथे बहुजनरत्न पुरस्कार उस्मानाबाद जिल्हा मुरूम येथे उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल बसवरत्न पुरस्कार तसेच भोर येथील उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार रत्न पुरस्कार देउन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. व आता त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना मित्र परिवार व पत्रकार बांधवाकडून शुभेच्छा मिळत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार