MB NEWS-सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा*

 सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा



बीड/प्रतिनिधी..........

    जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी उद्या दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे किंवा जिल्ह्यात संपूर्ण लाॅकडाउन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

      जिल्ह्यातील सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक ०१.०३.२०२१ रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकी मध्ये हमी दिली होती की, सर्व व्यापारी १५ मार्च २०२१ पर्यंत अॅन्टीजेन/आरटीपीसीआर टेस्ट करून घेतील, १५ मार्च २०२१ नंतर जो व्यापारी अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट न करता आपला व्यवसाय सुरु करेल त्यावर फौजदारी तसेच दंडात्मक कार्यवाही अनुसरावी. तसेच रेस्टॉरंट,बार, भाजीपाला- फळ विक्रेते यांचे प्रतिनीधी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून सर्व नियम पाळूनच व्यवसाय केले जातील लागू केलेले निर्बध शिथिल करण्यात यावेत अशी विनंती केली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली. परंतु प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यातील व्यापारी अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट न करताच आपले व्यवसाय सुरु केले आहेत. विशेष करून ग्रामीण भागातील व्यापारी यांनी अॅन्टीजन टेस्ट न करताच व्यवसाय चालू केलेले आहेत तसेच रेस्टॉरंट,बार, भाजीपाला फळ विक्रेते नियमांचे व निबंधाचे पालन न करताच व्यवसाय सुरु केले आहेत.

           कोरोना विषाणूचे बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच चाललेली संख्या यावरुन असे दिसून येते की, प्रशासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या उपाययोजना, नियम व निबंध लागू केले आहेत त्याचे पालन होत नाही. सर्व व्यापारी यांना पुनःश्च प्रशासनातर्फ आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांची अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट दिनांक २०.०३.२०२१ पर्यत करूनच आपले व्यवसाय सुरु करावेत. रेस्टॉरंट,बार हॉटेल व्यवसाईक यांनी आसन क्षमतेच्या ५० टक्के व इतर नियमांचे पालन करून, भाजीपाला-फळ विक्रेते यांनी देखील नियमांचे पालन करून व्यवसाय करावेत नसता प्रशासनाला पुर्ण लॉकडाऊन करणे यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार