MB NEWS-देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार

 देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर



सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार



सातारा : कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत असल्याचा आरोप वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलंय.

   सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. तर पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी उगारलेले हे हत्यार डोकेदुखी ठरणार आहे, असे दिसत आहे.

काय म्हणाले बंडातात्या कराडकर?

कोरोनाच प्रस्त वाढत नाही तर तसं भासवलं जातंय.

लोकसंखेच्या प्रणाणात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूप कमी आहे.


सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो.


केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत.


देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी.


पैठणच्या उत्सवा दिवशी शुक शुकाट असणे हे आमच्या बुध्दीला पटत नाही.


सरकारची चाकोरी तोडून आम्ही सर्व वारकरी जमणार आहोत.


कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवले जाताय, खोटे रिपोर्ट दिला जात आहे.


जेवढे कोरोनाचे पेंशंट होते त्यांना लुटले.


कोराना बाधित म्हणून बॉडी दिली जात नव्हती. त्या मृतदेहाचे सर्व अवयव गायब केले जात होते.


कोरोनाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊन दहशत निर्माण केली.


धार्मिक स्थळे उघडली तर लोकांच्या मनातून घबराट, भिती जाईल.


आत्मविश्वास हा अध्यात्म आहे, अध्यात्माची शक्ती असल्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.


देहू आणि पैठणची यात्रा भरली पाहिजे, यासाठी आम्ही ठाम आहोत.


आमच्यावर जे गुन्हे दाखल करणार त्याला आम्ही सामोरे जाणार, आंदोलन करणारच.



सरकारशी आम्ही बोलणार नाही, परवानगी मागणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार