युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे

बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे



*_कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव_*


बीड । दिनांक १९।

बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या. 



जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले. कर्ज बुडव्यांना बाजूला ठेऊन बॅक नफ्यात आणली, कारभार सुरळीत केला. सुरवातीला लोकांना देण्यासाठी एक रूपया देखील नव्हता, परंतू चांगला कारभार करत लोकांना बोलावून त्यांच्या ठेवी परत दिल्या असे त्या म्हणाल्या. 


*सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा अवमान* 

-------------------------------

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर झाला. सेवा सोसायटीचे उमेदवार बाद केले. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय केला गेला. जो नियम परभणीच्या बाबतीत तो आम्हाला का नाही ? असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणून अजब-गजब पध्दतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न झाला. या निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून सुरळीत चालू असलेल्या संस्थेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप पंकजाताई मुंडे यांनी केला.



*कोरमच पूर्ण होत नाही मग निवडणूक कशाला ?*

-‐-----------------------

निवडणूकीची ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी आहे. केवळ आठ जागेसाठी निवडणूक होत असल्याने तेरा जागेचा कोरम पूर्ण होत नाही, मग निवडणूकच कशाला ? असं त्या म्हणाल्या. येनकेन प्रकारे प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानाचा आम्ही निषेध करतो. उद्याच्या मतदानावर आमचा बहिष्कार आहे असे सांगत सर्व जागांची निवडणूक घ्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केली. 


   पत्रकार परिषदेस माजी आमदार भीमसेन धोंडे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा आदी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या