इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS -परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी

 परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी 



परळी वैजनाथ /प्रतिनिधी...

        गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे.वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



        याबाबत परळी वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता आंबडकर व देशमुख मॅडम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या बाबतीत सर्व दृष्टीने कुचंबणा सहन करावी लागत आहे. याबाबत तात्काळ अखंडित वीज पुरवठा करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी भाजयुमो चे प्रदेश सचिव अॅड.अरुण पाठक,अनिष अग्रवाल,योगेश पांडकर,प्रल्हाद सुरवसे,वैजनाथ रेकने,गोविंद चौरे,दिपक गित्ते,सुनील मस्के, बाळू फुले,शाम गित्ते व भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.



••••••••

*ग्राहकांच्या वीजबिल संदर्भात समस्या मांडल्या....*

   दरम्यान भाजयुमो च्या वतीने निवेदन सादर करण्यात येत असताना अनेक नागरीकही आपल्या समस्या घेऊन कार्यालयात आले होते.त्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.भाजयुमो कार्यकर्त्यांनी यावेळी अनेक ग्राहकांच्या वीजबिल संदर्भात समस्या अधिकार्यांसमोर मांडुन त्या सोडवून दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या