MB NEWS-डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन

 डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे शेमारु मराठीबाणा वाहिनीवर कीर्तन



बीड : प्रतिनिधी


संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा प्रचारक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचे नामाचा महिमा विशद करणारे हरिकीर्तन दि. १९ व २० मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत प्रक्षेपित होणार आहे.

श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त संत मीराबाई संस्थान, पाटोदा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफताना गुट्टे महाराजांनी संत एकनाथांच्या ‘आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी आहे सर्व’ या अभंगावर निरूपण केले होते. नामाचा व संतांचा महिमा विशद करणाऱ्या या कीर्तनाचे ‘शेमारु मराठीबाणा’ या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील आनंदवारी... उत्सव कीर्तनाचा या कीर्तनमालिकेत दि.१९ व २० रोजी सकाळी ८ वाजता प्रक्षेपण तर दि.२० व २१ रोजी सकाळी ७ वाजता पुन;प्रक्षेपन होणार आहे. या कीर्तनाचा भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संत मीराबाई आईसाहेब संस्थान, प्रमोदजी रणनवरे व संतोषजी साखरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार