युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा सारखा लपंडाव ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस

 परळीत थकबाकी व परमिटच्या नावाखाली विजेचा रोजच सारखा लपंडाव



ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीने ग्राहकांना धरले वेठीस

परळी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून विज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे.

विज वितरण कंपनी दिवसभरात किती वेळेस लाईट घालवते याचे काही वेळापत्रक राहिलेले नाही. थकबाकीदार ग्राहकांची लाईट कट करण्यासाठी दिवसात 20-25 वेळा लाईट बंद करण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली परमिट घेवून विज कट करतात पण विज कट करण्याचे वेळापत्रक काही केलेले नाही. विज कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले गेले आहेत. वितरण कंपनीने विज घालवण्याचे वेळापत्रक तयार करून ग्राहकांसाठी ते वृत्तपत्रात छापली पाहिजे. वितरण कंपनी कार्यालयात एखाद्या ग्राहकाने फोन केला तर तेथील कर्मचार्‍यांना लाईट पुरवठा सुरू आहे कि नाही हे माहिती नसते हे विशेष.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या