MB NEWS-शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२

 शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२


 


परळी वैजनाथ /प्रतिनिधी..........

       शहरातील मुख्य रस्त्यावर जणू अस्ताव्यस्त वाहतुकीला  कायदेशीर परवानगीच देउन टाकली आहे की काय अशी अवस्था सध्याआहे. ठिकठिकाणी फळांचे गाडे रस्त्यावर मनाला येईल त्या ठिकाणी कधीकधी तर रस्त्यावर मधोमध बिनदिक्कतपणे लावलेले असतात. वाहतूक कोंडी झाली तरी गाडा थोडा सुद्धा जागेवरून हलवण्याची तसदी ही घेतली जात नाही. उलट वाहनधारकांना या गाडेवाल्यांच्या रोषाला निमुटपणे सहन करण्याची वेळ कित्येकदा येते. सुरक्षीत वाहतूकीसंदर्भात कोणीच गंभीर नसल्याचे भयावह चित्र बघायला मिळत असते.. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा पी -१ पी-२ ची  पार्किंग व्यवस्था लावण्यात येणार आहे.

                  परळी शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले  असून, सुरक्षीत वाहतूकीसाठी  पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हातगाड्या व वाहनांचे रस्त्यांवर होणारे अडथळे दुर करण्यासाठी  उपाययोजना करण्याची गरज आहे.मोंढा,  एकमिनार चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, शिवाजी चौक, बसस्टॅण्ड आदी वर्दळीच्या ठिकाणीच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. सोमवारी बाजारच्या दिवशी तर जवळपास सर्वच मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम असते. बाजार समितीच्या गोलाईतून तर पादचाऱ्यांना ही कुठून जावे हा प्रश्न पडलेला असतो. 

                  

     पी -१ पी-२ .......

                    दरम्यान काही वर्षांपूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्याचा दृष्टीने चांगली व्यवस्था लावण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन दरदिवशी  पी -१ पी-२ ची शिस्त लावली होती. याची सुरुवातीला  अडचण वाटली होती पण नंतर या व्यवस्थेची सर्वांना सवय झाली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मोठी मदत झाली होती तसेच रस्ते मोकळे व सर्वांना उपयोग होत होता. परंतु ही व्यवस्था मोडकळीस आली. पुन्हा तेच वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर आले.शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी आता पुन्हा एकदा पी १ पी२ सुरू करण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !