इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाचा संसर्ग ; संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

 ना.धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोनाचा संसर्ग ; संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन 



मुंबई..... राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त धनंजय मुंडे यांच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आले आहे.

दरम्यान, काळजीचे कारण नाही.सर्वांनी काळजी घ्यावी,सोशल डिस्टंसिंग पाळत कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिक यांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या