इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर*

 भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर



महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आवडत्या मायबोली या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून येत्या रविवार पासून सलग तीन दिवस 

दि 21 22 आणि 23 मार्च 2021 पर्यंत. थोर किर्तनकार वै. रामेश्वर महाराज गुट्टे परळी वै. यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राज्यस्तरीय भव्य किर्तन महोत्सव परळी-वैद्यनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पाचवे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे यांच्या सुमधूर आवाजात उत्कृष्ट किर्तनसेवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 

आपुला तो एक देव करूनी घ्यावा

या अंगावरील चिंतनीय किर्तनसेवा जिवनात सुख पाहिजे असेल तर जगात फक्त देव आपलासा करावा लागतो अशा पद्धतीने सोनवणे महाराज यांनी अतिशय मार्मिक चिंतन अभंगातून आपल्या समोर मांडले आहे तरी सर्वांनी या मायबोली वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या किर्तन रंग या मालिकेतील हे किर्तन पुष्प ऐकायला व पाहायला विसरू नका असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक डाॅ. अरूण रामेश्वर महाराज गुट्टे, दिलीपराव रामेश्वर महाराज गुट्टे व रामायणाचार्य भरत महाराज गुट्टे तसेच संयोजक युवाकिर्तनकार भागवताचार्य अमोल महाराज गुट्टे व गुट्टे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!