MB NEWS- *काळरात्र: बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र' !* ⬛ *_परळीच्या बसस्थानकात घडली ह्रदयद्रावक घटना_* ⬛

 *काळरात्र: बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र' !* 



⬛ *_परळीच्या बसस्थानकात घडली ह्रदयद्रावक घटना_* ⬛


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.…

    एक बाप आपल्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन परळीच्या बसस्थानकात आला.रात्र झाली म्हणून बसस्थानकात च प्लॅटफॉर्मवर चिमुकल्याला छातीशी कवटाळून झोपला.पण बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र ' हरवल्याची ह्रदयद्रावक घटनापरळीच्या बसस्थानकात दि. २१ रोजी रात्री घडली. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख शाहेद शेख उस्मान रा.बरकतनगर परळी वैजनाथ हा इसम बाहेरगावाहून दि. २१ रोजी रात्री परळीच्या बसस्थानकात उतरले.त्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर अंथरुन टाकुन आपल्या तीन ते चार वर्षांच्या मुलाला घेऊन तो इसम झोपी गेला.दि.२२ रोजी सकाळी नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या या इसमाला व मुलाला बघितले.दिवस उजाडुन बराच वेळ झालेला असतानाही हे झोपडीतून उठले नाही हे बघून नागरीकांनी जवळ जाऊन बघितले असता झोपलेल्या इसमाच्या हालचाली बंद असल्याचे निदर्शनास आले.नागरीकांनी ही बाब पोलीसांना कळवली.पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा इसम मयत झाल्याचे लक्षात आले.पोलीसांनी मयताची ओळख पटवण्याच्या दृष्टीने शोध घेतला असता मयत इसम नामे शेख शाहेद शेख उस्मान रा.बरकतनगर परळी वैजनाथ असा पत्ता लागला.याप्रकरणी उत्तरीय तपासणी नंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोह होळंबे हे करीत आहेत.

    दरम्यान आपल्या बापाच्या कुशीत निर्धास्तपणे बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र' हरवलं.या चिमुकल्या मुलासाठी मात्र ही काळरात्र ठरल्याची चर्चा व हळहळ नागरीक व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार