MB NEWS-वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद

 वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिलपर्यंत राहणार बंद



परळी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी वाढवण्यात आला असून, येत्या 04 एप्रिलपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, बीड यांनी याबाबत आज नवे आदेश काढले आहेत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे गर्दी होण्याची श्यक्यता लक्षात घेता महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंदचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. पुढील 04 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर जरी बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू असणार आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!