MB NEWS-वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे

 वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - लाॕकडाऊनचे सारे नियम सहिष्णू आहेत म्हणून मंदिरांनी किती दिवस सहन करायचे.देव आणि भक्त यांच्यात कायमचा दुरावा निर्माण करायचा आणि लोकांची भावना देवधर्मावरची उडवायची हाच हेतू यातून प्रकर्षाने मंदिर बंद ठेवून प्रत्ययाला येतो आहे काय? असा सवाल ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी प्रशासनाला विचारला आहे .भाविक भक्तांना त्यांच्या उपास्य देवतेच्या आराधनेपासून कडक निर्बंध लादून अगोदरच वंचित ठेवलेले आहे.शंभर फुटावरुन बेल, फुल,गंध ,अक्षता याचेवर कडक नियमावली केली आहे .


भक्तांना दूर अंतरावरुन दर्शन घेण्याची सक्ती आहेच.परंतु देवधर्माची ओळख पण बुडली जावून नास्तिकवाद आपसूकच स्विकारला जाईल या उद्देशाने हे कुटील डाव टाकण्याचे पाप तर होत नाहीये ना.अशी शंका उपस्थित करून याचा निषेध कीर्तनकार तथा संतवाङमयाचे संशोधक आणि वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केला आहे. त्वरित वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी त्यांनी केली असून मंदिर बंद असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर करत प्रभू वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे.

टिप्पण्या

  1. हॉटेल, डान्सबार सगळं चालू आहे.फक्त सप्ताह,मंदीर आणि गोरगरीब शेतकर्यांच्या लेकीबाळीचे लग्न बंद.हा कसला कारभार आहे?

    मित्रानो यावर मंथन होणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. बिअर बार सुरू आहेत मंदिर का बंद?
    नवीन राजकारण आहे
    यात्रा बंद आहे त सप्ताह बंद देवळात कुलूप लावून दारू चे आङ्ङे सुरू केले ?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार