MB NEWS-फुलचंद कराड यांनी इशारा देताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी

 फुलचंद कराड यांनी इशारा देताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

परळी तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचे विज तोडणीची मोहीम जोरदार हाथी घेतल्याने तालुक्यातील अनेक गाव अंधारात गेली होती. गाव गावचा पाणी प्रश्न निर्माण झाला होता.परतु भाजपा नेते फुलचंद कराड यांनी परळीचे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा  काढला होता. लिंबूटासह तालुक्यातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

          शेतकऱ्यांना बिलाबाबत सहकार्य करा आणि तात्काळ बंद असलेली वीज सुरू करा अन्यथा उद्या व्यापक स्वरूपात आंदोलन उभे होईल आणि हजारो शेतकरी विजवीतरण कार्यालयासमोर येतील असा इशारा फुलचंद कराड यांनी दिला होता. इशारा देताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून याबाबत तोडगा काढला व बिलात सवलत देऊन तात्काळ पैसे भरून घेतले व विजजोडणी केली. फुलचंद कराड यांच्या आंदोलनाला यश आले असून, यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व दुष्काकाळाच्या झळा सोसत असणाऱ्या शेतकऱ्यांना बेवाजवी बिले दिली गेली आहेत. एकीकडे बेवाजवी बिल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.बिलाची थकबाकीच कारण गाव गावच्या डिपीचे कनेक्शन तोडली गेली आहेत. यामुळे गावगावचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेताच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीच्या नुकसांनी बरोबर जनावरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांनी फुलचंद कराड यांच्या निवास्थानाकडे धाव घेतली आणी शेकडो शेतकऱ्यांबरोबर परळीच महावितरण कार्यालय गाठले. तेथील महावितरण अधिकारी प्रशांत अंबडकर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढला आहे. महावितरण अधिकाऱ्यांना फूलचंद कराड यांनी सांगितले कि प्रत्येक शेतकऱ्यांकडुन 5000 हजारा ऐवेजी 3000 हजार रुपये प्रति कृषीपंप बील भरणा करुन देतो. तुम्ही त्वरित लाईट चालू करुन द्या

असे सांगितले.तो निर्णय अधिकाऱ्यांना पटला आणी अतिषय सामंजस्याने प्रश्नमार्गी लावला आहे.या निर्णयामुळे संपुर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन फुलचंद कराड यांचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !