पोस्ट्स

इमेज
  परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट;पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     परळीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.परळीतील चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट झाला असुन काल दिनांक.29 रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घरणीकर रोडवरील बाजारात खरेदी करणाऱ्या पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 29 रोजी सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या सुमारास धरणीकर रोडवरील बाजारात बाजाराची खरेदी करत असताना फिर्यादी मनोज प्रल्हाद अग्रवाल रा. विद्यानगर परळी वैजनाथ यांचा मोबाईल गर्दीमध्ये अज्ञात चोरट्याने खिशातून काढून घेतला. त्याचबरोबर श्रीनिवास किशनराव कुलकर्णी रा. कावळ्याची वाडी यांचा मोबाईल तसेच अरुण प्रभू चव्हाण रा. वसंत नगर ,बंडू लक्ष्मण मुंडे रा. लिंबुटा, बापूराव विष्णू खोत पाटील रा. शंकर पार्वती नगर परळी वैजनाथ अशा पाच जणांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी खिशातून काढून नेला. या पाच मोबाईलची एकूण किंमत अंदाजे पन्नास हजाराच्यावर
इमेज
 * हेळंब सेवा सोसायटीवर पंकजाताई मुंडेंच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व* *जय मल्हार शेतकरी विकास पॅनलचे  सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन* परळी  । दिनांक २८।    तालुक्यातील हेळंब सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित  पॅनेलला पराभवाची धुळ चारत भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.    हेळंब सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी आज निवडणूक झाली.  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - लक्ष्मण आंधळे, रामराव पवार, तुकाराम पाळवदे, यशवंत पाळवदे, प्रभू राठोड, काशीनाथ होळंबे, माधव होळंबे, व्यंकटी होळंबे, नानासाहेब होळंबे, सुरेखा आंधळे, सुनिता होळंबे, राधाकिसन घुले, गोविंद इंचके  
इमेज
  थर्मलजवळील जिलेटिन स्फोट घटना ; सुरक्षा यंत्रणा सदैव सतर्क- थर्मलला काहीही धोका नाही ! नागरिकांनी घाबरून जाऊ नये- मोहन आव्हाड             परळी वैजनाथ, प्रतिनिधी... अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            मराठवाड्यातील एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे,बॅटरी,वायर
इमेज
  चक्क... पोलीस ठाण्यातूनच पकडलेल्या दोन आरोपींचा गुंगारा  पेठ बीड ठाण्यातून दोन आरोपींचा गुंगारा ! बीड- गुटखा तस्करी प्रकरणात एसपींच्या विशेष पथकाने पकडलेले दोन आरोपी पेठ बीड पोलीस ठाण्यातून फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रभर आरोपींचा शोध सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.या पथकाने शनिवारी बार्शी नाका भागात एक जीप पकडली.ज्यामध्ये 8 लाखाचा गुटखा सापडला.या प्रकरणात शेख मोहसीन आणि शेख इकबाल या दोघांना अटक केली. या आरोपींना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्यावेळी आरोपीनी मळमळ होत असल्याचा बहाणा करत पोलीस शिपाई संजयकुमार राठोड यांच्या तावडीतून हे दोघे फरार झाले.या आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रभर पोलीस पथके गस्त घालत होते. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
इमेज
  नीट परिक्षेचा निकाल 7 तारखेला ! नवी दिल्ली- मेडिकल एन्टरन्स परीक्षेच्या अर्थात नीट ची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.7 सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असून त्यापूर्वी omr शिट्स आणि उत्तरपत्रिका मिळेल.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीत रहा अन अपडेट मिळवण्यासाठी News&Views शी कनेक्टेड रहा. नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. याचे निकाल 30 ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन त
इमेज
  पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;तात्काळ पंचनामे करा- खा.डॉ.प्रीतम मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..         मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून याची चौकशी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.         याबाबत खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची चौकशी करून पंचनामे करणे अत्यंतआवश्यकआहे.मागील वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन फुलोरा असताना ही दाणे भरण्याची प्रक्रिया थांबली आहे तसेच कापसामध्ये पण पातेगळ (पाने गळणे) होत आहे. त्याच बरोबर मुग, उडीद इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.अशा संकटसमयी याबाबत चौकशी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्
इमेज
भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी घेतली  शपथ  नवी दिल्ली, दि. 27 : भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी  आज  शपथ  घेतली. राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी  सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी ( दि. 26 ऑगस्ट 2022) संपला. न्या.लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022  रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या.लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली क
इमेज
  रानबा गायकवाड यांना बंधूशोक; रविवारी सकाळी अंत्यसंस्कार परळी (प्रतिनिधी)     ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रानबा गायकवाड यांचे मोठे बंधू अनुरथ यादव गायकवाड यांचे आज शनिवार रोजी पुणे येथे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले  त्यांच्यावर उद्या सकाळी आठ वाजता शांतीवन स्मशानभूमी भीम नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.         अनुरथ गायकवाड हे फुले, शाहू ,आंबेडकर, चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचे योगदान राहिले आहे. पुणे येथे   अल्पशा आजाराने आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे निधन झाले.               रविवारी सकाळी अंत्यसंस्कार     अनुरथ गायकवाड यांच्या पार्थिवावर उद्या रविवार सकाळी आठ वाजता भिम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते.
इमेज
परळीतील गणेश विसर्जनाचे पारंपरिक ठिकाण हरीहर तिर्थाची उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांनी केली पहाणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. यामध्ये परळीतील गणेश विसर्जनाचे पारंपारिक ठिकाण असलेल्या हरिहर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांनी पाहणी केली.          प्रभु वैद्यनाथ मंदीर परीसरातील "हरीहर तीर्थ" गणपती विसर्जनाचे पारंपारीक ठिकाण आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.गणेशोत्सवाची प्रशासकीय पातळीवर विविध तयारी सुरु आहे.गणेश मंडळे, मिरवणुका,मिरवणुक मार्ग, गणेश विसर्जन आदींचा आढावा घेण्यात येत आहे.या अनुषंगाने आज पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी हरीहर तिर्थ परिसराची पहाणी केली. ■ ADVERTIS
इमेज
  गणेशोत्सवापूर्वी  शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा-प्रा.अतुल दुबे. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   गौरी -गणपती उत्सवाचे दिवस जवळ आलेले असून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी परळी वैजनाथ न.प.प्रशासनाने शहरातील मुख्यरस्त्या सोबतच छोट्या गल्लीतील खुड्डे बुजवावेत व विविध ठिकाणी ढाप्याची ही दुरवस्था झाली आहे. तेही दुरुस्त करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.  परळी शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे झाले आहेत तसे ढाप्याच्याही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अगदी काही दिवसांवरच गौरी-गणपती उत्सव आला असून परळी वैजनाथ शहरातील मुख्य रस्त्या सह छोट्या गल्लीमध्ये मोठ मोठे खड्डे असून यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना मोठा त्रास होत असुन रोजी छोट्या-मोट्या स्वरूपाचे अपघात होत आहेत. शहरातील प्रत्येक भागात गणरायच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या भव्य मिरवणूक काढण्यात येतात अश्या वेळी या खड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येते नाही व यामुळे शहरात कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्मा
इमेज
 *गाढे पिंपळगाव येथे बैलपोळा उत्साहात साजरा* परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)                                                                      तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बैलपोळा परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती मुळे बैलपोळा साजरा करता आला नाही. यंदा हरहर महादेवच्या घोषणेत बैलांच्या भव्य मिरवणूका काढण्यात आल्या.            गाढे पिंपळगाव येथे बैलपोळा शेतकऱ्यांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गेले दोन वर्षे पोळा सण शेतकऱ्यांना कोरोनामुळे साजरा करता आला नाही. गाढे पिंपळगाव येथे प्रत्येक सणांचे मान गावपातळीवर परंपरेने ठरवण्यात आले आहेत, होळीचा मान शरदराव राडकर, दसऱ्याचा मान मार्तंडराव वाघमोडे, यांच्याकडे आहेत ही परंपरा गेले अनेक वर्षांपासून चालू आहे त्यानुसार बैलपोळ्याचा मान जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे यांच्या कडे परंपरागत आहे. गावात सुरुवातीला वाघमोडे यांच्या बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. मारुती व महादेव मंदीराला पाच फेरी घालून गावात वेशीवर जे तोरण आहे हे त्यांच्या कडून तोडले जाते व संपूर्
इमेज
  सिनेस्टाईल पैशांची बॅग पळवली गेवराई ....  : महिला बचत गटांची रक्कम जमा करुन बीडला येत असलेल्या आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याची पिशवी पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी गेवराई – बीड महामार्गावर घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक मागावर गेले आहे. बीड येथील आयडीएफसी बँकेच्या शाखेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ रा. माटेगाव ( ता. बीड ) हे नेहमी प्रमाणे पाचेगाव ( ता. गेवराई ) येथून महिला बचतगटांची रक्कम वसूल करून ती शाखेत भरण्यासाठी बीड येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येताना. गेवराई -बीड महामार्गावर पाडळसिंगी जवळ आले असता पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोघे जण होते. त्यांनी दुचाकी जवळ आणून पैशांची पिशवी हिसकावून घेऊन बीडच्या दिशेने धुम ठोकली. सदरील कर्मचाऱ्याने आरडाओरडा केली परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले. सदरील पिशवीत ९५ हजार ६१० इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती पोलीसांना देताच गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय प्रफुल्ल साबळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. लवकरच चोर

MB NEWS-गोगलगायीने पिडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार

इमेज
  *विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्या मागणीला अखेर यश; गोगलगायीने पिडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार* *गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे राज्य शासनाचे आदेश* बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, धनंजय मुंडेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी मुंबई (दि. 26) : विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह, माजी मंत्री धनंजय मुंडे व विरोधी पक्षाच्या विविध सदस्यांनी विधिमंडळात गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केलेल्या मागणीला यश येताना दिसत असून, राज्य शासनाने यासंदर्भात बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील सोयाबीन व अन्य ज्या पिकांचे गोगलगायीनी नुकसान केले, त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे पारित केले आहेत. बीड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार, 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले असून, या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास द्यावे
इमेज
 *शिक्षकाविषयी चुकिची वक्तव्य करणारे आ.प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाकडून जाहीर निषेध* परळी / प्रतिनिधी राज्याच्या विधान सभेत शिक्षकांविषयी बेताल व वायफळ गरळ ओकणारे सुज्ञ व सुसंस्कृत आमदार प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी तिव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवला आहे.      मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात आमदार प्रशांत बंब यांचे  विधिमंडळातील वक्तव्य शिक्षकांना वेठबिगार समजणारे असून शिक्षकांना हिटलरप्रमाणे वागणूक देणारे तसेच शिक्षक वर्गाच्या भावना दुखवणारे व अपमानित करणारे आहे.       शासक वर्गाच्या चुकीच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या दुष्परिणामांना शिक्षकांना जबाबदार धरण्याचा आमदार महोदयांचा तो केविलवाणा प्रयत्न होता. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण महाग होत चालले आहे,  सर्वसामान्यांचा आवाक्याच्या बाहेर चालले आहे यावर हे महाशय चकार शब्द बोलत नाहीत.  गावातील नागरिकांनाच रहायला घरे नाहीत तर शिक्षकांना कुठून मिळतील घरे न
इमेज
नागेश संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे सत्यान्वेषी व निर्दोषरित्या संशोधन होणे आवश्यक - ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे सोलापूर (प्रतिनिधी) नागेश संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा सांगोपांग ,साक्षित्वाने आणि निर्दोष संशोधन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन एकदिवसीय "राष्ट्रीय चर्चासत्राचे" समारोपप्रसंगी, संत वाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.        श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी श्रीक्षेत्र वडवाळ व देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय "राष्ट्रीय चर्चासत्र" श्री नागेश संप्रदायाच्या साहित्यातील तत्वज्ञानाचा अभ्यास या विषयावर आयोजित  करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन न्यायाधीश श्रीमती सुनिता कंकणवाडी धर्मादाय उपायुक्त सोलापूर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून झाले तर बीजभाषण प्राचार्य इ.जा तांबोळी यांचे झाले.या कार्यालयात डॉ.सुरैय्यापरवीन जहागीर जहागीरदार यांनी लिहिलेल्या ,"मध्ययुगीन संत: अज्ञानसिध्द व शहा मुंतोजी बामणी "याचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीगणेश देशपांड

परळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग_*

इमेज
 विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना वाव मिळतो -संजय केंद्रे परळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग परळी (प्रतिनिधी) विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो. नव्या संकल्पनांना चालना मिळते आणि त्यातून मानवाच्या उत्क्रांतीसाठी पोषक असलेल्या गोष्टींचा शोध लागतो असे प्रतिपादन परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले. ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी हिना अन्सारी, मुख्याध्यापक शास्त्री कांबळे, पत्रकार दत्तात्रय काळे, सय्यद सबअत अली, परीक्षक अशोक पवार, सुनिल चव्हाण यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. Click : ● *हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तल
इमेज
  नात्याला काळीमा: म्हातारचळ लागलेल्या आजोबांकडून नातीवर अत्याचार दिंद्रुड, प्रतिनिधी....       नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. म्हातारचळ लागलेल्या एका इसमाच्या दुष्कृत्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८५ वर्षीय आजोबांनी आपल्या अल्पवयीन (१० वर्षे)नातीवर अत्याचार केल्याची घटना  उघडकीस आली आहे. सर्वजण शेतात गेल्याने अल्पवयीन नात आजोबासोबत घरीच होती. याचा गैरफायदा घेत आजोबाने अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. आई शेतातून घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने सारी हकीकत सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. यावरून आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click : ● *हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू* नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केला असल्याचे  दिंद्रुड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
इमेज
  हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..              अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आज (दि.25) सकाळच्या सुमारास परळी -गंगाखेड रस्त्यावरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे त्या ठिकाणी घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.      राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहत असलेल्या पवार कुटुंबातील  तीन भावंडं खेळत खेळत  राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. त्या ठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेला त्यांचा सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना बघितली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. साक्षीचे वडील घटनास्थळावर येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस पवार कुटुंब राहते. राखेच्
इमेज
 * खोडवा सावरगांव सेवा सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा धुव्वा* *सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन* परळी  । दिनांक २४।    खोडवा सावरगांव सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित  पॅनेलचा धुव्वा उडवत भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.    तालुक्यातील खोडवा सावरगांव    सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली श्री वडमाऊली माता जनसेवा  पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते.  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र भाजप प्रणित पॅनलने राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १३ जागांवर  दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - गोदाबाई दहिफळे, तुळशीराम दहिफळे, अनंत उर्फ विठ्ठल दहिफळे, वैजनाथ  दहिफळे, वैजनाथ लक्ष्मण दहिफळे
इमेज
भूषण पाठे यांची इंटरनॅशनल ह्यूमन राइट कौन्सिल  ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुभाष पाठे यांची इंटरनॅशनल ह्युमन राईट कौन्सिल ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.           औष्णिक विद्युत केंद्र, परळी वैजनाथ येथे कार्यरत असलेले उप व्यवस्थापक (मासं) श्री.भूषण सुभाष पाठे यांची त्यांनी केलेल्या मानवाधिकार कामाचा संदर्भ घेऊन संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेत विशेष स्थान असलेले इंटरनॅशनल ह्यूमन राइट कौन्सिल या गैरसरकारी व गैरव्यवसायिक संस्थेवर वीज व नवकरणी ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी  निवड करण्यात आलेली आहे.        श्री पाठे हे मूळचे भुसावळ येथील असून ते महाराष्ट्र पक्षी मित्र तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सभासद सुद्धा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ते अविरत कार्य करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
इमेज
  सामाजिक कार्यकर्ते मुक्तार शेख यांना प्राचार्य बी.के.सबनीस स्मृती सद्भावना पुरस्कार प्रदान ! अंबाजोगाई : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मिशन ह्युम्यानीटी फाउंडेशन चे सर्वेसर्वा मुक्तार शेख यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय स्व: प्राचार्य बी.के.सबनीस स्मृती सेवा सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त योगेश्वरी शिक्षण व कर्मचारी पतसंस्था,एन सी सी,जयहिंद ग्रुप आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.बी.शिंदे हे होते तर विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जनसहयोग चे श्याम सरवदे,व इतर अनेक मान्यवर होते.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे होते. पुरस्कार स्विकारल्या नंतर सत्काराला उत्तर देताना/आपले मनोगत व्यक्त करताना शेख मुक्तार म्हणाले की, आपण आजपर्यंत स्व:खुषीने व सामाजिक कार्याच्या आवडीमुळे अनेक बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करत आलेलो आहोत.कोरोना काळात देखील आपण शक्य होईल तेवढी मदत/सहकार्य सर्वसा
इमेज
 *सरकारमध्ये कामगार प्रतिनिधी नसल्यानेच कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत- काॅ. डी एल कराड*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...         राज्य व केंद्र सरकारमध्ये कामगारांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत नसल्यामुळेच वर्षानुवर्ष कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात. याचा विचार करून कामगार एकजुटीने सरकारला नमवले पाहिजे असे प्रतिपादन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काॅ. डी एल कराड यांनी केले.          परळी वैजनाथ येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा सिटूचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड उपस्थित होते. या अधिवेशनाला सिटू संघटनेचे राज्य सरचिटणीस काॅ.एम.एम. शेख, राज्य कोषाध्यक्ष के आर रघु उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी संघटनेच्या मागील तीन वर्षाचा कार्य अहवाल सादर केला व अधिवेशनात तो मंजूर करण्यात आला.काॅ.  एम एम शेख यांनी यावेळी राज्यातील व देशातील कामगारांच्या प्रश्नाबद्दल मार्गदर्शन करून संघटनेत एकजुटीने सक्रिय होऊन लढा दिल्यास हमखास यश येते त्यामुळे सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन केले.      यावळी डी वाय एफ आय चे जिल्हा अध्यक्ष विशाल देशमुख, शेतमजूर युनियन

MB NEWS-जी. के. फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

इमेज
  जी. के. फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - पं. उद्धवबापू आपेगावकर, ज्योतिराम घुले, सुहास सिरसट, कल्याण कुलकर्णी  आदींसह 10 दिग्गजांचा गौरव ....... - येत्या 30 ऑगस्ट रोजी दिंद्रुड येथे भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा  ...... दिंद्रुड : सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत अग्रेसर असलेल्या जी. के. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्यावतीने येत्या 30 आॅगस्ट रोजी भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा-2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील 10 कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत दिग्गजांना जी. के. फाऊंडेशनतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संयोजक तथा जी. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद केकान यांनी दिली आहे.  दिंद्रुड येथील स्वराज्य मंगल कार्यालयात 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा रंगणार आहे. क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणारे भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतिराम घुले (क्रीडा), जागतिक कीर्तीचे पखवाजवादक पंडित उद्धव(बापू) आपेगावकर (कला आणि संस्कृती)

MB NEWS- *पंकजाताई मुंडे देणार परळीतील स्थानिक कलाकार अन् महिलांच्या कलागुणांना वाव !*

इमेज
 * पंकजाताई मुंडे देणार परळीतील स्थानिक कलाकार अन् महिलांच्या  कलागुणांना वाव !*      *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने  गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवाचे आयोजन* *विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह मिळणार आकर्षक बक्षिसं ; ३० ऑगस्टपर्यंत नांव नोंदणी करण्याचं आवाहन*  परळी ।दिनांक २४।  स्थानिक कलाकार आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव देणारा गौरी गणपती स्पर्धा महोत्सव  यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवातंर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह विविध आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. स्पर्धेसाठी ३० ऑगस्ट पर्यंत नांव नोंदणी करावी असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व द टर्निंग पाॅईटच्या वतीनं करण्यात आलं आहे.   शहरात चांगल्या प्रकारे सांस्कृतिक चळवळ रूजावी तसेच स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम  सुरू केलेला आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे हा उपक्रम घेता आला नव्हता पण आता यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने हया स्
इमेज
  मराठवाडा शिक्षक संघ तालुका अध्यक्षपदी अनुप कुसुमकर शहराध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड परळी / प्रतिनिधी मराठवाडा शिक्षक संघाची परळी तालुका व शहर कार्यकारणीची निवड करण्यासाठी सोमवार (दि.22) रोजी कॉ.वैजनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे तर व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले, बंडू अघाव, जिल्हा सचिव गणेश आजबे, जिल्हा सहसचिव परवेज देशमुख, विजय गणगे, माजी जिल्हाउपाध्यक्ष सुरेश काजळे, सोपान निलेवाड, मावळते तालुकाध्यक्ष के.आर.कस्बे, मावळते शहराध्यक्ष राजकुमार लाहोटी, प्राचार्य अरुण पवार, मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत परळी तालुका व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड पार पडली. बैठकीचे प्रास्ताविक बंडू अघाव यांनी केले.सुत्रसंचालन अंनत मुंडे यांनी केले तर आभार यरकलवाड यांनी मानले. परळी तालुका कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष: श्री.अनुप कुसुमकर (महाराष्ट्र विद्यालय, मोहा),सचिव : श्री श्रीधर माधवराव गुट्टे (श्री केदारी महाराज विद्यामंदिर, नंदनज)